शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खडसे यांना भाजपने न्याय न दिल्यास भोरगाव लेवा पंचायत विरोधात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 16:31 IST

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये माजी मंत्री तथा समाजाचे नेते एकनाथराव खडसे यांचे नाव आले नाही. त्यामुळे हा समाजाचा अपमान आहे.

ठळक मुद्देपहिल्या यादीत नाव न घेतल्याने निषेधसमाजाने कोणताही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम होतोराज्यातील किमान ३५ विधानसभा मतदारसंघांवर परिणाम होणारलेवा पाटीदार समाज खान्देश, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला४० वर्षांपासून खडसे हे भाजपला जिल्ह्यात रुजविण्यासाठी अहोरात्र प्रयत्नरत

भुसावळ, जि.जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये माजी मंत्री तथा समाजाचे नेते एकनाथराव खडसे यांचे नाव आले नाही. त्यामुळे हा समाजाचा अपमान असून, खडसे यांना भाजपने न्याय न दिल्यास सकल लेवा समाजाची बैठक घेऊन भोरगाव लेवा पाटीदार पंचायत योग्य तो निर्णय घेईल, असा इशारा भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी दिला आहे. याचा परिणाम राज्यातील किमान ३५ विधानसभा मतदारसंघांवर होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. याचबरोबर त्यांनी भाजप नेतृत्वाचा निषेध केला आहे.येथील जामनेर रोडवरील सोनीच्छा वाडीजवळ आयोजित पत्रकार परिषदेत कुटुंबनायक रमेश पाटील बोलत होते. यावेळी भोर पंचायतचे सदस्य डॉ.नरेंद्र कोल्हे (यावल), बाळू पाटील, भुसावळ येथील लेवा समाज युवक महासंघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश पाटील, सुहास चौधरी, मंगला पाटील, आरती चौधरी आदी सदस्य उपस्थित होते.भाजपची पहिली यादी १ रोजी प्रसिद्ध झाली. ही यादी पाहून समाजाला मोठे दु:ख झाले. पहिल्या यादीत खडसे हे डावलले गेले तो समाजाचा अपमान आहे. त्यामुळे निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आल्याचेही काही सदस्यांनी सांगितले. लेवा पाटीदार समाज खान्देश, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला आहे. ४० वर्षांपासून माजी मंत्री खडसे हे भाजपला जिल्ह्यात रुजविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. भाजपचा झेंडा हाती घेण्यास कोणी तयार नव्हते, त्या वेळेपासून ते प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्यांचं नाव सन्मानपूर्वक पहिल्या यादीत घेणे गरजेचे असल्याचेही मत कुटुंबनायक पाटील यांनी व्यक्त केले. गेल्या तीन वर्षांपासून भाजप खडसे यांच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वी खडसे यांना माहिती दिली असल्याचे कुटुंबनायक पाटील यांनी सांगितले, तर समाज हा माजी मंत्री खडसे यांच्यासोबत असून, भाजपने खडसे यांची दखल न घेतल्यास भोरगाव पंचायतीचे २१ सदस्य व आठ निमंत्रित सदस्य यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. समाजाने कोणताही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातील सहा, त्याचप्रमाणे पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, डोंबिवली, मुंबई, अमरावती, मलकापूर, कोथरूड आदी ३५ मतदारसंघांवर होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :ElectionनिवडणूकBhusawalभुसावळ