अट्टल गुन्हेगारांची घेतली ओळख परेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 18:15 IST
भुसावळ शहरातील गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी डीवायएसपींची कारवाई भुसावळ : दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याने उपविभागीय पोलीस ...
अट्टल गुन्हेगारांची घेतली ओळख परेड
भुसावळ शहरातील गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी डीवायएसपींची कारवाई भुसावळ : दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारीत वाढ होत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हेगारांवर अंकुश बसविण्यासाठी पाऊल उचलले आहे. शनिवार रोजी त्यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड घेतली. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या काही वर्षात खुन , दरोडे, बलात्कार, चोऱ्या, घरफोडीच्या घटना वाढल्या असून गावठी कट्ट्याचा जणू महापूर वाहत आहे. खंडणीच्या गुन्ह्यातही वाढ होत आहे. अशा गुन्हेगारांवर अंकुश बसविण्यासाठी शनिवार रोजी ही ओळख परेड घेतली. डीवायएसपी वाघचौरे यांनी याआधीच्या काळात शिर्डीला गुन्हेगार मुक्त केले आहे, त्याच प्रमाणे भुसावळ शहराला सुद्धा गुन्हेगार मुक्त करण्यासाठी गुन्हेगारांचा सर्व डाटा तयार करण्यात आला आहे. यामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद झाला तरी , त्या गुन्हेगारांचा डाटा वाघचौरे यांच्याकडे तत्काळ नोंद करण्यात येणार आहे. त्या गुन्ह्यादारावर पुन्हा गुन्हा दाखल झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकारे गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी सिस्टम तयार करण्यात आली आहे. या पद्धतीने काम सुरू झाले असून या अनुषंगाने शनिवारी शहरातील हिस्ट्रीसिटरांची ओळख परेड बाजारपेठ पोलीस स्टेशनला राबविण्यात आली. सदर प्रसंगी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पो. कॉ. विकास सातदिवे पो. हे. कॉ. तस्लिम पठाण , पो. कॉ. संजय भदाणे , सचिन पोळ , भालेराव , कृष्णा देशमुख यांच्या सह ,तालुका पोलीस स्टेशन,शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.