सरकार भाजप आणि राष्ट्रवादीचेच स्थापन होईल. काँग्रेसने एक महिन्यापासून घोळ चालवला होता. त्यांच्याकडून दररोज एका नवीन पदाची अपेक्षा वाढत होती. म्हणून सकाळी सरकार स्थापनेबाबत हा निर्णय घेतला. मी अजित पवारांसोबत व राष्ट्रवादी सोबत आहे. एकदा निर्णय घेतला आणि अजित पवारांसोबत जायचे असे पाऊल उचलले. आता देखील अजित पवार यांच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मी अजित पवार व राष्ट्रवादीसोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 15:03 IST