शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दारुसाठी पतीने पत्नीस भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:28 IST

उपचारादरम्यान मृत्यू : लासूर येथील घटनेत पतीस अटक

चोपडा : दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही म्हणून राग आल्याने पतीनेच पत्नी सुनंदा अनिल भिल (वय २५) हिस चाकूने भोसकल्याची घटना लासूर येथे घडली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याने पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे.याबाबत प्राप्त वृत्त असे की, सुनंदा अनिल भिल हिचा विवाह अनिल आधार भिल याचेशी सात वर्षांपूर्वी झाला होता मात्र तो नेहमी दारू पिऊन त्रास देत असल्याने गेल्या वर्षभरापासून सुनंदा माहेरी वराड ता. चोपडा येथे राहत होती. ७ रोजी तिचा नंदोई मुलाचे लग्नासाठी तिला लासुर येथे घेऊन आले. तेथे ९ रोजी संध्याकाळी ७ वाजता पती अनिल भिल याने सुनंदाकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तिने दिले नाही याचा राग आल्याने त्याने सुनंदास चाकूने भोसकले.यामुळे तिला गंभीर दुखापत झाल्याने जखमी सुनंदास गावातील खाजगी डॉक्टरकडे उपचार करून वराड येथे नंदोई घेऊन आला. त्यानंतर माहेरच्या लोकांनी जखमी सुनंदास उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान ११ रोजी १० वाजता तिचा मृत्यू झाला.या प्रकाणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात सुनंदाची बहीण रेखाबाई नंदू भिल (२०) रा भोईटी ता.शिरपूर ह.मु. वराड हिच्या फियार्दीवरून आरोपी अनिल आधार भिल (३०) रा. लासुर याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी अनिल आधार भिल यास काही वेळातच अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर व हवालदार काशिनाथ पाटील हे करीत आहेत. आरोपीवर कडक कारवाईची मागणी सुनंदाच्या माहेरच्यांनी केली आहे.

टॅग्स :Murderखून