नाशिक : चारित्र्याचा संशय व सततच्या मारहाणीला कंटाळलेल्या पत्नीने पतीचा गळा आवळून व ब्लेडने वार करून त्याची हत्या केल्याची घटना औरंगाबादरोडवरील निलगिरीबाग झोपडपीत शनिवारी घडली़ निलगिरीबाग झोपडपीत राहणारा संजय निंबा शार्दुलच्या (३५) हत्येप्रकरणी त्याची पत्नी मंगल शार्दुलला (३०) पोलिसांनी अटक केली. शनिवारी पती-पत्नीत वाद झाल्यानंतर दारूच्या नशेत संजयने गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्या केल्याची नोंद आधी करण्यात आली होती.शवविच्छेदनानंतर गळ्यावर ब्लेडने वार केल्याने अतिरक्तस्त्राव होऊन तसेच गळा आवळल्याने संजयचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी शार्दुलची पत्नी, आई, वडील, मुले यांची सखोल चौकशी केली. सुरवातीला त्यांनी हत्येचा इन्कार केला. मात्र नंतर कबुली दिली. दारूचे व्यसन असलेला संजय पत्नीशी सतत भांडण करून तिला मारहाण करीत असे़ शनिवारी संजयने भांडण केल्यानंतर मंगल यांनी त्याचे हात बांधून गळ्यावर ब्लेडने वार केले तसेच दोरीने त्याचा गळा आवळून खून केला़ (प्रतिनिधी)
छळाला कंटाळलेल्या महिलेकडून पतीची हत्या
By admin | Updated: May 5, 2014 21:44 IST