शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

पतीने केला पत्नीवर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: September 25, 2015 00:09 IST

धुळे : घरगुती वादात पतीने लोखंडी हातोडय़ाने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

धुळे : घरगुती वादात पतीने लोखंडी हातोडय़ाने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना 22 सप्टेंबरला रात्री 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील अग्रवाल भवन परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अग्रवाल भवन परिसरात राहणारा मनोज कृष्णा चारुंडे (वय 30) याला बाहेरगावी जायचे होते. म्हणून तो त्याची पत्नी कविता मनोज चारुंडे (वय 28) हिच्याकडून भाडय़ासाठी पैशांची मागणी करत होता. परंतु कविताने पैसे न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने मनोजने संतापाच्या भरात शिवीगाळ, दमदाटी करत कविताच्या डोक्यावर लोखंडी हातोडय़ाने वार केला. त्यामुळे कविताच्या कानाच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली.

याप्रकरणी कविताचे वडील सुभाष भिकू मोगाम (रा.अग्रवाल भवन परिसर, धुळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मनोज चारुंडेवर भादंवि कलम 307, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी मनोजला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.