शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मालवाहूच्या धडकेत पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 18:02 IST

पत्नी वनरक्षक : सहस्त्रलिंगनजीक घटना

पाल ता रावेर : येथून काही अंतमरावरील सहस्त्रलिंगजवळ मालवाहून मिनी ट्रक व दुचाकी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात पाल येथील वन विभागाच्या वनरक्षक ममता हेमंत पाटील (वय २९) व त्यांचे पती हेमंत उत्तम पाटील (वय ३२) हे दोघे ठार झाले. ही दुर्घटना सोमवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली.दोघे पती-पत्नी गाडीवर रावेरहून आपले शासकीय काम आटोपून पालकडे येत असताना प्रादेशिक वन विभाग नर्सरी जवळ मालवाहू मिनी ट्रकने (क्रमांक एमपी १० जी २१०५) दुचाकीस (एम.एच. १९ डीजे ३११२) जबर धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, ममता हेमंत पाटील या जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती हेमंत पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचाकरितासाठी नेत असताना रत्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.मिनी ट्रकचालक फरारहा अपघातामुळे मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दी जमू लागल्याचे पाहून ट्रक चालकाने तेथून पळून गेला.मुलीसाठी घेतलेली फळ विखुरलीममता हेमंत पाटील या प्रादेशिक वन विभाग रावेर अंतर्गत निमड्या येथे गेल्या तीन वषार्पासून वनरक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांना पाच वर्षांची एक मुलगी आहे. रावेरहून निघताना त्यांनी मुलीसाठी खाऊ म्हणून सफरचंद घेतले होते. अपघातस्थळी हे सफरचंद विखुरले होते.घटनेची माहिती मिळताच पाल येथील पोलीस स्टेशनचे पोहेकॉ राजेंद्र राठोड हे तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. ममता पाटील यांचे माहेर अमळनेर येथील असून त्यांचे पती हेमंत पाटील हे मुळचे कासारखेडा, ता. यावल येथील रहिवासी आहेत.दोघाचे मृतदेह रावेर येथे हलवून तेथे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वन विभागातील अधिकारी वर्ग हजर होता.