शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या कामामुळे अडथळयांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 11:28 IST

औरंगाबाद, अकोला व चाळीसगावसाठी लागतात दीड ते दोन तास जादा

ठळक मुद्देऔरंगाबादसाठी साडेतीन ऐवजी साडेचार ते पाच तास

जळगाव : जिल्ह्यातून जाणारा जळगाव ते चिखली या राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण, जळगाव ते औरंगाबाद व जळगाव ते मनमाड या दोन रस्त्यांचे रुंदीकरण सुरु आहे. रस्त्याच्या कामामुळे अनेक भागात नागरिकांना तारेवरची कसरत करीत मार्ग काढावा लागतो आहे. या कामांमुळे जुन्या मार्गाची साधी दुरूस्तीही होऊ न शकल्याने मोठमोठे खड्डे ठिकठिकाणी पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे.या सर्व गोंधळामुळे जळगाव ते औरंगाबादला आणि जळगाव ते चाळीसगाव जाण्यासाठी तीन तासांऐवजी चार ते साडेचार तास तर अकोला जाण्यासाठी चार ऐवजी पाच तास लागत आहे. त्यामुळे हा प्रवास आता कंटाळवाणा तितकाच जिकरीचा बनला आहे.राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. यात तरसोद ते चिखली व तरसोद ते फागणे असे दोन टप्पे आहेत. यातील तरसोद ते चिखली या मार्गाचे काम गेल्या सहा महिन्यापांसून गतीने सुरू आहे. तर तरसोद ते धुळे जिल्ह्यातील फागणे या मार्गाचे काम ठेकेदाराला आलेल्या काही अडचणींमुळे बंद पडले आहे. चौपदरीकरणाच्या कामात दोन्ही बाजुंनी साडेसात-साडेसात मिटरचे दोन मार्ग आहेत तर आत दुभाजक असेल. दोन्ही टप्प्यात चौपदरीकरणाची रूंदी अशीच असेल केवळ जळगाव ते भुसावळ दरम्यान वाहतूक जास्त असल्यामुळे दोन्ही बाजुंनी दहा-दहा मिटरचा रस्ता असेल. या दोन्ही मार्गात ठिकठिकाणी खोदून ठेवले वाहतुकीची कोंडी होत आहे.औरंगाबादसाठी साडेतीन ऐवजी साडेचार ते पाच तासजळगाव ते औरंगाबाद मार्ग दुहेरीकरणासाठी खोदण्यात आला आहे. रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. जळगाव ते औरंगाबाद हे १६० किलोमीटरचे अंतर असून,एस.टी.टॅव्हल्स व रुग्णवाहिका यांना हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी तीन ते साडेतीन तास लागायचे. मात्र, रस्त्याच्या कामामुळे हे अंतर पार करण्यासाठी साडे चार ते पाच तास लागत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेले खोदकाम, खडी-मुरुमचे पडलेले ढिगारे, सिमेंटचे पाईप व वाहनामुळे उडणाऱ्या धुळीने वाहनधारकांना अतिशय संथ गतीने वाहन चालवावे लागत आहे. प्रचंड उडणाºया धुळीमुळे तर चालकांना समोरचे अस्पष्ट दिसत असल्यामुळे, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.चाळीसगाव, अकोल्याकडे जाण्यासाठींही एक ते दीड तासांचा विलंबजळगावहुन चाळीसगाव, धुळे, व अकोला या राष्ट्रीय मार्गांवरही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यामध्ये धुळ्याचे काम बंद असले तरी, चाळीसगाव व अकोला या रस्त्यांचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यामध्ये जळगाव ते चाळीसगावचे अंतर १०२ किलोमीटर असून, तीन तासांऐवजी ४ तास लागत आहे. जळगाव ते अकोला १८० किलोमीटरचे अंतर या ठिकाणी जाण्यासाठी बसला ५ तासांऐवजी सहा तास लागत असल्यााचे एस.टी, रुग्णवाहिका व ट्रॅव्हल्सच्या चालकांनी सांगितले.जळगाव-औरंगाबाद मार्ग खिळखिळाजळगाव -औरंगाबाद हा राज्य मार्ग आहे. त्याच पद्धतीने जळगाव ते चाळीसगाव व पुढे मनमाड हादेखील राज्य मार्ग आहे. दोन्ही बाजुंनी पाच-पाच मिटरने हे काम या रस्त्यांवर सुरू आहे. जळगाव औरंगाबाद रस्त्याचे डांबरीकरण ते जळगाव-चाळीसगाव रस्त्याचे कॉँक्रिटीकरण केले जात आहे. या मार्गावरही ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. तर खराब झालेल्या रस्त्याची दरवर्षी पावसाळ्यानंतर डागडुजी केली जात तीदेखील यंदा होऊ शकलेली नाही.अतिरिक्त भत्ता देण्यात यावाजळगाव आगारातून औरंगाबाद, चाळीसगाव, अकोला या मार्गावर दररोज पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत बस फेºया सुरु असतात. बस निघाल्यानंतर औरंगाबाद येथुन सात तासात परत तर धुळ््याहुन सहा व चाळीसगावहुनही सहा तासात परत व्हावे. असे प्रत्येक चालकाला वेळेचे वेळापत्रक ठरवुन दिले आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे दिलेल्या वेळेपत्रकापेक्षा दररोज दीड ते दोन तासांचा विलंब होत असल्याने, एसटीच्या चालकांनी जादा कामाचा अतिरिक्त भत्ता द्यावा. अशी मागणी विभागनियंत्रकांकडे केली आहे. गेल्या आठवड्यातच संयुक्त कृती समितीचे अध्यळ गोपाळ पाटील तर महाराष्ट्र एस.टी वर्कस काँग्रेस(इंटक)तर्फे संदीप सुर्यवंशी यांनी केली आहे.