शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचोरीसाठी आणले जाताय लिलावात अडथळे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:27 IST

विश्लेषण

सुशील देवकरजळगाव- वाळू गटांचे लिलाव करण्यात अडथळे आणून वाळू चोरी करण्याचे तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील, राज्यातील वाळू आणून ती अधिक किंमतीला विक्रीचे प्रकार आता सुरू झाले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाळूला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.मागील वर्षी वाळू लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल झाली. त्याच्या सुनावणीसाठी राज्यभरातील वाळू गटांच्या लिलावाला स्थगिती मागण्यात आली होती. त्यामुळे वाळूचे लिलाव रखडले होते. आता यंदाही बरोबर वाळू गटांचे लिलाव होण्याच्या काही दिवस आधीच नागपूर उच्च न्यायालयातच याचिका दाखल झाली आहे. त्यात वाळू गटांच्या लिलावाला स्थगिती देण्यात आलेली नसली तरीही त्यासाठी जाहिरातीवर खर्च करण्यास मनाई आहे. जाहिरात दिल्याशिवाय निविदा निघू शकणार नसल्याने साहजिकच निविदा प्रक्रिया रखडली आहे. या परिस्थितीत वाळू चोरीचे प्रमाण मात्र प्रचंड वाढले आहे. कारण बांधकामे सुरू असून अधिकृत वाळू पुरवठा मात्र बंद आहे. याचा फायदा वाळू माफियांना मिळत आहे. दरवर्षीच वाळू गटांच्या लिलावापूर्वीच याचिका कशा दाखल होतात? याबाबत कानोसा घेतला असता नागपूर जिल्ह्यात वाळू माफियांनी ही क्लृप्ती योजत असल्याचे समजले. कारण अनेक वाळू माफियांनी लगतच्या जिल्ह्यात अथवा राज्यात वाळू ठेके घेतलेले असतात. वाळूची मागणी मात्र नागपूर शहरात जास्त असल्याने वाळू गटांना स्थगिती मिळवून बाहेरच्या राज्यातील वाळू तेथे विक्री केली जाते. एका नेत्याने तर भंडारा जिल्ह्यातील सर्व वाळूठेके घेऊन नागपूर जिल्ह्यातील वाळू ठेक्यांना स्थगिती घेतली होती. सहाजिकच त्याच्या ठेक्यांमधील वाळूच नागपूरात विक्री झाल्याची चर्चा आहे. राज्य शासनाने या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाळूलाही जिल्ह्याबाहेर विक्रीस मनाई करण्यासारख्या उपाययोजना करण्याची गरज आहे. शासनाने नुकतेच नदीपात्रापर्यंत वाळूचे डंपर न नेता वाळू उपसा करून मक्तेदाराने तो जवळच एक डेपो करून त्यात साठवावा. तेथून प्रशासनाच्या परवानगीने तो विक्रीसाठी न्यावा, असे आदेश दिले आहेत. मात्र याची अंमलबजावणी कितपत यशस्वी होते? याबाबतही साशंकताच आहे.