शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

लॉकडाऊनची उपासमार सहन होईना- व्यथा स्थलांतरितांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 15:42 IST

परप्रांतातून पोट भरण्यासाठी जामनेर व परिसरात आलेल्या कामगारांची कोरोना लॉकडाऊनमुळे उपासमार होत आहे.

ठळक मुद्देघरी जाण्याची परवानगी मिळेना जामनेरच्या परप्रांतीयांची व्यथा

मोहन सारस्वत/सय्यद लियाकतजामनेर, जि.जळगाव : परप्रांतातून पोट भरण्यासाठी जामनेर व परिसरात आलेल्या कामगारांची कोरोना लॉकडाऊनमुळे उपासमार होत आहे. आणखी किती दिवस उपासमार सहन करायची, यापेक्षा गावाकडे गेलेलेच बरे, असा विचार करून परवानगीसाठी आॅनलाईन अर्ज केले, मात्र प्रशासकीय अडचणींमुळे परवानगी मिळत नसल्याने हतबल झालेले कामगार निराश झाले आहे.थंड पेय, पाणी पुरी विक्रेत्यांसह हॉटेल कारागीर असलेले परप्रांतातील सुमारे अडीच हजार कामगार जामनेर व ग्रामीण भागात अडकून आहेत. कानपूर, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेल्या या मजुरांना काम नसल्याने घराची ओढ लागली आहे. गावी परतण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली मात्र अद्याप काहीही उत्तर मिळत नसल्याने मजूर हतबल झाले.परराज्यातील मजुरांच्या आधार कार्डावर पूर्ण नाव नसल्याने आॅनलाईन नोंदणीत अडचणी येत असल्याने त्यांनी आमदार गिरीश महाजन यांच्याकडे व्यथा मांडली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अडचण सोडविण्याची मागणी केली.शहरात उत्तर प्रदेश येथील भय्या लोकांचे थंड पेय विक्रीचे दुकान असून काही जण हातगाडी लावून व्यवसाय करतात. सुमारे २०० जणांचा यावर उदरनिर्वाह आहे. पाणीपुरी विकून चरितार्थ चालविणारे बिहार व कानपूर येथील काही कुटुंबीय लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक अडचणीत सापडले.राजस्थान येथील फरसाण व मिठाई दुकानदार जामनेर, फत्तेपूर, नेरी, पहूर, शेंदुर्णी येथे आहेत. त्यांच्याकडे काम करणारे घराकडे जाण्यासाठी आतूर झाले आहे. आॅनलाईन परवानगी साठी अर्ज करून देखील प्रशासनाकडून काहीही हालचाल होत नसल्याने त्यांची तगमग वाढत आहे.देशी दारू दुकान चालविणारे अांध्रप्रदेश येथील असून त्यांच्याकडे काम करणाºया मजुरांची संख्या सुमारे ५० असावी. दीड महिन्यापासून दुकान बंद असल्याने चरितार्थ कसा चालवावा याची चिंता त्यांना सतावत आहे.घर व दुकानातील पीओपीचे काम करणारे परप्रांतीय मजूर शहरात कुटुंबांसह राहतात. काम सुरू होईल या आशेवर मजुरांनी गावाकडे जाणे टाळले.तालुक्यातील सुमारे अडीच ते तीन हजार कामगार सुरत, वापी येथे कामासाठी जातात. वीटभट्टीवर तर काही कारखान्यात काम करतात. मिळेल त्या वाहणारे हे मजूर गावाकडे परतत आहेत. जामनेरसह ग्रामीण भागात परतणाºया मजुरांना तपासणी करून गावात घेतले जात आहे. काही ठिकाणी मजुरांना शाळेच्या इमारतीत ठेवले जात असून, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत. चिंचखेडे तवा या गावातील १४ कुटुंबीय सुरत येथून परतल्यानंतर त्यांनी गावाबाहेर शेतातच राहणे पसंत केले.मध्य प्रदेशात पायी जाणारे मजूर रात्री भुसावळ अथवा मुक्ताईनगर मार्गे शहरातून जाताना दिसतात. एकत्रित जाणाºया मजुरांना जेवण पुरविण्यासाठी सामाजिक संस्था व कार्यकर्ते मदत करतात.लॉकडाऊनपूर्वीच कुटुंबियांना घरी पाठविले. हॉटेलमध्ये काम करून रोजी रोटी मिळवितो, मात्र हॉटेल बंद असल्याने अडचण वाढली. घराची ओढ आहेच परवानगी मिळण्याची वाट बघतोय.- दिवाकर कुमावत (मिस्तरी), नानंद, बिहारथंड पेय विक्री बंद असल्याने सुमारे ४० कामगार बेरोजगार झाले. दीड महिन्यापासून घरातच आहोत. रोजगार नसल्याने घर खचार्ची चिंता वाढली आहे. कामगारांना घराकडे जाण्याची ओढ लागली मात्र परवानगी मिळत नाही.-राहुल रामकीसन भय्या, थंडपेय विक्रेते, कानपूरवालेदोन हजार प्रमाणपत्रांचे वाटपपरराज्यात जाणाºया सुमारे दोन ते अडीच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले.-डॉ.विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर