शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या खरेदीसाठी जळगावच्या बाजारपेठेत प्रचंड उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 22:06 IST

पूजेच्या साहित्यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी उसळली गर्दी

ठळक मुद्देसुवर्णबाजारात दुस:या दिवशीही गर्दीवाहनधारकांची कसरतचोपडी पूजनासाठी खरेदी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18- चैतन्यमय प्रकाशपर्वाचा गुरुवारी महत्त्वपूर्ण दिवस. या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी बुधवारी जळगाव शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. सुवर्ण बाजारही सलग दुस:या दिवशी फुलला होता.   जळगावच्या बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी  सकाळपासून सायंकाळर्पयत बाजारपेठेत प्रचंड  गर्दी झाली होती.  गेल्या आठवडय़ापासूनच बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे.  बुधवारी  महात्मा गांधी रोड, फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट या परिसरात कपडय़ांच्या खरेदीसाठी  तरुणाईसह पुरुष, महिला, लहान मुलांची गर्दी झालेली होती. या सोबतच टॉवर चौक ते घाणेकर चौक या दरम्यान पूजेच्या साहित्यासह विविध वस्तूंची दुकाने थाटली होती. 

 पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी लगबगबाजारपेठेत थाटलेल्या पूजा साहित्याच्या प्रत्येक दुकानावर गर्दी झालेली होती.  केरसुणी, लक्ष्मीची मूर्ती, लाह्या-बत्तासे यांची मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आली. लक्ष्मीच्या मूर्ती 60 रुपये ते 400 रुपयांर्पयत उपलब्ध आहे. या सोबतच लक्ष्मीपूजनात अनन्य महत्त्व असलेल्या केरसुणी 20 रुपये 40 रुपये प्रति नग विक्री होत आहे. यामध्ये लहान आकाराच्या केरसुणींनादेखील मागणी असून त्या 15 रुपयांपासून उपलब्ध आहे. या सोबतच लाह्या 60 रुपये किलो तर बत्तासे 70 ते 80 रुपये किलोने विक्री होत आहे. 

विविध रंगांच्या रांगोळींना मागणीलक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी अंगणात रांगोळी काढण्यालादेखील मोठे महत्त्व असल्याने विविध रंगांच्या रांगोळींनी दुकाने सजली आहेत. पांढरी रांगोळी 10 रुपये किलो विक्री होत असून पाच रुपयांपासून पाकीट उपलब्ध आहे. 

चोपडी पूजनासाठी खरेदीव्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. यामुळे यासाठी चोपडी (वह्यांची) देखील आज मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. लहान आकारापासून मोठय़ा आकारातील वह्या, रजिस्टर यांची खरेदी करण्यात आली. 20 रुपयांपासून 400 रुपयांर्पयतच्या वह्यांना मागणी होती. घर, अंगण उजळून टाकणा:या पणत्या विविध आकार, प्रकारात विक्रीस आल्या असून त्यांचीही मोठय़ा प्रमाणात विक्री झाली.  या सोबतच बोळकेदेखील वेगवेगळ्य़ा रंगात उपलब्ध आहेत. दरवाजा, देव्हा:यासमोर लावण्यात येणारे रंगीत पावले, वेगवेगळ्य़ा नक्षी, स्वस्तिकचे स्टीकरच्या दुकानांवरही गर्दी झाली होती. दहा रुपयांपासून 80 रुपयांर्पयत हे स्टीकर उपलब्ध आहे. 

फुले मार्केटमधील वाहनतळ फुल्ल महात्मा फुले मार्केटमध्ये आज वाहनतळही अपूर्ण पडले. तेथे वाहने लावण्यास जागा नव्हती. अनेक जण बाहेर इतरत्र वाहने लावून खरेदी करताना दिसून आले. 

वाहनधारकांची कसरतसंध्याकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी एवढी गर्दी वाढली की, रस्त्यांवरून वाहने काढणेदेखील कठीण झाले होते. त्यामुळे टॉवर चौक, चित्रा चौक, नवीपेठ या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. 

वाहनांना वाढली मागणीचारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात बुकिंग करण्यात आले असून दिवाळीला 100च्यावर चारचाकी वाहनांची विक्री अपेक्षित असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहरात एकाच दालनात 110 चारचाकींचे बुकिंग झालेले आहे.  दुचाकींना देखील मागणी वाढली असून 200 दुचाकींची विक्री अपेक्षित आहे. 

सुवर्णबाजारात दुस:या दिवशीही गर्दीजळगावातील सुवर्णबाजारात सोने खरेदीसाठी आज सलग दुस:या दिवशी गर्दी कायम होती. धनत्रयोदशीला मंगळवारी मोठय़ा प्रमाणात सुवर्ण खरेदी झाल्यानंतर बुधवारीदेखील सुवर्णपेढय़ा गजबजून गेल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनादेखील मोठी मागणी होती.

सोने खरेदीसाठी आजही गर्दी होती. धनत्रयोदशीला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आजही सोने खरेदीस चांगला प्रतिसाद होता. - मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर.सी. बाफना ज्वेलर्स.

चारचाकी वाहनांच्या खरेदीस चांगला प्रतिसाद असून दिवाळीसाठी 110 वाहनांचे बुकिंग झालेले आहे. - राजू निकुंभ, महाव्यवस्थापक, मानराज मोटर्स.