शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

‘सिव्हील’मध्ये पसरली प्रचंड दरुगधी

By admin | Updated: February 17, 2017 01:13 IST

चेंबरला लागली गळती : नाकाला रुमाल लावण्याशिवाय नाही पर्याय

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण विभागाकडे जाणा:या जिन्यानजीक चेंबरला गळती लागल्याने या परिसरात प्रचंड दरुगधी पसरली असून येथून नाकाला रुमाल लावूनच रुग्ण, नातेवाईकांना ये-जा करावी लागत आहे. त्या शिवाय येथे बोलण्यासाठी तोंड उघडूच शकत नसल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढून उपचाराऐवजी आजाराचीच भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, रुग्णालय परिसरात इतरही ठिकाणी गळती लागल्याने डासांचे प्रमाण वाढत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र दिले असले तरी निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा रुग्णालयातच रुग्णांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. दुस:या मजल्यावर असलेल्या आंतररुग्ण विभागातील व आजूबाजूच्या परिसरातील शौचालयातील पाणी व मलमूत्र वाहून नेणा:या चेंबरला जिन्याच्या पायथ्याशीच गळती लागली आहे. यामुळे येथे घाण होऊन प्रचंड दरुगधी पसरली आहे. नाकाला रुमाल लावून वावरदुस:या व तिस:या मजल्यावर अपघात, जळीत व इतर कक्ष आहे. त्यामुळे येथे नेहमी रुग्णांची मोठी संख्या तर असतेच सोबतच त्यांच्या नातेवाईकांचे येणे जाणे सुरू                  असते. सतत ये-जा असलेल्या याच ठिकाणी नेमकी दरुगधी पसरल्याने त्याचा सर्वानाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथून येताना जाताना प्रत्येक जण नाकाला रुमाल अथवा कापड लावूनच जात आहे. अडथळ्य़ामुळे गळतीचेंबरच्या पुढे पाईपांमध्ये अडथळा (ब्लॉक) निर्माण झाल्याने चेंबरनजीकच सर्व पाणी व मलमूत्र साचून तेथेच त्याची गळती होत आहे. इतरही ठिकाणी गळतीजिल्हा रुग्णालय परिसरात अतिदक्षता विभागाच्या  (आयसीयू) मागे, जुन्या रक्तपेढी मागेदेखील पाईपांना गळती लागून तेथे पाणी साचत आहे. या शिवाय औषधी भांडारच्या मागे पाईप सडले असून शेवाळ लागले आहे. पाण्याच्या कुपनलिकेजवळही गळतीजिल्हा रुग्णालयात असलेल्या पाणीपुरवठय़ाच्या कुपनलिकेजवळही गळती असून शौचालयाचे पाणी या कुपनलिकेजवळ साचते. यामुळे येथील पाण्याच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होतो. उपचारापेक्षा आरोग्याचाच प्रश्नजिल्हा रुग्णालयात येणा:या रुग्णांवर उपचारापेक्षा रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याचाच येथे प्रश्न निर्माण होतो. गळतीमुळे डासांचे प्रमाण वाढून आजारी रुग्णांना दंश करणा:या डासांनी नातेवाईकांना दंश केल्यास आजाराचा फैलाव आरोग्याच्या जबाबदारी असलेल्या रुग्णालयातूनच होऊ पाहतआहे.सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रजिल्हा रुग्णालयातील गळती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देऊन दुरुस्ती करण्याविषयी कळविले आहे. मात्र निधी नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा रुग्णालयाला सांगितले. त्यामुळे हे काम रखडले आहे. अत्यावश्यक सेवेबाबतही गांभीर्य नाहीआरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असली तरी सा.बां. विभागाकडून जिल्हा रुग्णालयातील  कामांबाबत गांभीर्य घेतले जात नसल्याचे बोलले जात आहे. निधी नसल्यास जिल्हाधिका:यांकडून अत्यावश्यक सेवेसाठी तो मंजूर करून काम करता येवू शकते, असेही जाणकारांचे म्हणणे           आहे.वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकाचे पद रिक्तगेल्या पाच-सहा वर्षापासून जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकाचे पद रिक्त आहे. या पदावरून निरीक्षक निवृत्त झाल्यानंतर हे पद भरलेच गेलेले नाही.