शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्या झालेल्या प्रांतातील दुष्काळाच्या गंभीर झळांचे वास्तव हवाई पाहणीत सरकारला कसे कळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 16:06 IST

तब्बल दोन वर्षांपासून सुमारे साडेअकरा हजार किलोमीटर अंतर गोसेवा सद्भावनेसाठी पायी भ्रमंती करताना समाजातील अंतिम टोकावरील घटकांशी हितगूज साधताना ध्यानात आले की, देवनार, गोवा, मुंबई, केरळ या भागात गोहत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने सदरील भागात दुष्काळाच्या झळा कमालीच्या तीव्र आहेत. या भागातून पायी चालत येताना चार दिवस आंघोळीला पाणी मिळू न शकल्याने हवाई पाहणीतून दुष्काळाची पाहणी करणाºया सरकारला दुष्काळाची ही गंभीर दाहकता तरी कशी कळणार? असा सवाल राष्ट्रीय गोसेवा मुस्लीम प्रकोष्ठ मंचचे राष्ट्रीय संयोजक प्रा.मोहंमद फैजखान यांनी केला.

ठळक मुद्देसंडे स्पेशल मुलाखतलेह लद्दाख ते अमृतसर या १४ हजार कि.मी.ची गोसेवा सद्भावना पदयात्रा काढणाऱ्या प्रा.मोहंम्मद फैजखान यांनी मुलाखतीत व्यक्त केला सवाल

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तब्बल दोन वर्षांपासून सुमारे साडेअकरा हजार किलोमीटर अंतर गोसेवा सद्भावनेसाठी पायी भ्रमंती करताना समाजातील अंतिम टोकावरील घटकांशी हितगूज साधताना ध्यानात आले की, देवनार, गोवा, मुंबई, केरळ या भागात गोहत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याने सदरील भागात दुष्काळाच्या झळा कमालीच्या तीव्र आहेत. या भागातून पायी चालत येताना चार दिवस आंघोळीला पाणी मिळू न शकल्याने हवाई पाहणीतून दुष्काळाची पाहणी करणाºया सरकारला दुष्काळाची ही गंभीर दाहकता तरी कशी कळणार? असा सवाल राष्ट्रीय गोसेवा मुस्लीम प्रकोष्ठ मंचचे राष्ट्रीय संयोजक प्रा.मोहंमद फैजखान यांनी मुलाखतीत व्यक्त केला.छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रा.मोहंम्मद फैजखान यांनी लेह (लद्दाख) ते कन्याकुमारी व कन्याकुमारी ते अमृतसर या तब्बल तीन वर्षांच्या गोसेवा सद्भावना पदयात्रेचे साडेअकरा हजार किलोमीटर अंतर पार करत रावेर शहरात आगमन केल्याप्रसंगी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.प्रश्न - मुस्लीम समाज व गोसेवा ही समाज मतभिन्नता असताना आपण गोसेवेकडे कसे वळलात?मोहंम्मद फैजखान - बालपणी रायपूर शहरात आईवडील दोन्ही नौकरीत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिशुवर्गात माता पिता व गोसेवेचे संस्कार व सत्संग घडल्याने गोसेवेचा ध्यास लागला. दरम्यान, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना गिरीश पंकजजी या लेखकाच्या ‘एक गाय की आत्मकथा’ या हिंदी कादंबरीतील मुस्लीम नायकापासून खºया अर्थाने प्रेरणा मिळाली. ही भौतिकता असली तरी परमेश्वराने त्यासाठी माझ्या हातून गोसेवा करण्यासाठी कदाचित मला निवडले असावे.प्रश्न - आपण एक राज्यशास्त्राचे प्राध्यापक असताना गोसेवा सद्भावनेसाठी का समर्पित झालात?उत्तर- मी हिंदी व राज्य शास्त्रात एमए व राज्यशास्त्रात एम फीलचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. छत्तीसगडमधील पुरमपूर महाविद्यालयात प्राध्यापक पदावर दोन वर्ष सेवा बजावली. मात्र संघाने दिलेल्या गोमाता सेवा व संस्कारातून प्रेरणा मिळाल्याने प्राध्यापकाची सेवा सोडली. गोमाता सद्भावना, गोरक्षण, पंचगव्यतत्वाचा प्रचार व प्रसार करून समाजात जनजागृती करण्यासाठी व हिंदू -मुस्लीम समाजात गोसेवेसंदर्भात निर्माण झालेली द्वेषभावनेची दरी साºया जगाची माता असलेल्या गोसेवेच्या प्रेमाने भरून काढण्यासाठी लेह (लद्दाख) ते कन्याकुमारी व कन्याकुमारी ते अमृतसर या दोन तीन वर्षांचाकालखंड असलेल्या १४ हजार किलोमीटर पदयात्रेचे गोसेवा सद्भावनेसाठी २४ जून २०१७ पासून समर्पित झालो आहे.प्रश्न - आपण या भारतभ्रमणातून काय संदेश देवू इच्छितात?उत्तर- हिंदू धर्मातील गायीच्या धार्मिक महतीपलीकडे जावून पाहता गाय ही सबंध मानवकल्याणासाठी पंचमहाभूतांनी बनलेली अमृतसंजीवनी असून, ती कोणत्या एका जातीधमार्पुरता मर्यादित नाही. शेती उत्पादनात वापरल्या जाणाºया नत्रयुक्त रासायनिक खतांमुळे कॅन्सरचा भस्मासूर फोफावला आहे. गायीचे शेण व मुत्र कॅन्सरवर रामबाण उपाय असून ब्रेनट्युमरच्या कॅन्सरवर गोमुत्राची मात्रा रामबाण ठरली आहे. म्हणून शेतीशिवारात नत्रयुक्त खतांऐवजी गायीचे शेणखत व गोमुत्राचा वापर करण्याची गरज आहे. गायीचे दूध, दही, तूप, गोमुत्र व शेण ही पंचगव्य पृथ्वी, जल, अग्नी, वायु व आकाश या पंचमहाभूतांसमान असल्याने वेदशास्त्रांनी गाय ही साºया विश्वाची जननी असल्याची दिलेली शिकवण मानवजातीला अमृतसंजीवनी ठरली आहे. मोहंमद पैगंबरांनीही इस्लाम धर्माला गायीचे दूध हे स्वास्थ्य तर गायीचे तूप हे औषध असून गोमांस हे रोगराईचे माहेर असल्याची शिकवण दिली. ख्रिश्चन धर्मगुरू इसामोसाही यांचा जन्मही गायीच्या गोठ्यात झाल्याचा तर श्री प्रभूरामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, श्री गुरूदेवदत्त, समर्थ रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद व संत मंहतांनी दिलेली गोसेवेची शिकवण मानवजातीला उजागर करणारी असल्याचा प्रसार व प्रचार या पदयात्रेतून करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रश्न - आपली करनी व कथनी एकच असल्याचे आपण कसे पटवून द्याल?उत्तर- मुस्लीम समाजाला गोसेवेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मी स्वत: ‘गाय और इस्लाम’ हे हिंदीतील पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे. गोसेवा पदयात्रेतूनही करीत असून, बकरी ईद, ईदनुल्लादाबी, रमजान ईद सारे सण गायीला चारापाणी घालूनच साजरे करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रश्न-गोसेवेचा प्रचार प्रसार करताना आपल्यावर काही सामाजिक बंधनाची अडचण निर्माण होते का?उत्तर- हो नक्कीच. हिंदू व मुस्लीम समाजात माझ्या गोसेवा सद्भावना पदयात्रेला विरोध करणाºया नकारात्मक भावनेचे किमान पाच टक्के लोक आढळून येतात. मुस्लीम समाजातून काही म्हणतात काफिर बन गया.. तर हिंदू समाजातून मुस्लीम असल्याने तो काय आपल्याला शिकवीन व त्याला काय अधिकार पोहचतो? अशी विकृती आढळून येते. काही ठिकाणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडेही माझ्या पदयात्रेविरूध्द तक्रारी करण्यात आल्या. धमक्याही दिल्या गेल्या. पण माझी पदयात्रा माझे सहकारी पीयूष राय (उत्तर प्रदेश), बाबा परदेशी रामसाहू (छत्तीसगड), कैलास वैष्णव (राजस्थान) यांच्यासह अव्याहतपणे अमृतसरकडे सांगतेसाठी सुरू आहे.

टॅग्स :interviewमुलाखतRaverरावेर