काय म्हणतात निवडणूक निर्णय अधिकारी
नगरपालिका निवडणूक वार्ड रचना पूर्वतयारी बाबत सूचना आल्या आहेत. या व्यतिरिक्त इतर सूचना प्राप्त नाहीत. आयोगाकडून सूचना प्राप्त झाल्यास जाहीर करण्यात येईल.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी.
काय म्हणतात जिल्हाध्यक्ष ?
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यासाठी भाजप सुरुवातीपासूनच ठाम आहे. हे आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी निवडणुका लांबणीवर टाकण्याची जी भूमिका आहे, ती आमचीदेखील आहेच.
- आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष, भाजप.
आरक्षण देऊन प्रत्येकाला संधी मिळालीच पाहिजे. कोणीही वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय झाला असून तो योग्यच आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्यासाठी टाकलेले हे पाऊल असून त्यास पाठींबा आहे.
- विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
ओबीसी आरक्षण मिळावे, ही सर्व पक्षांची भूमिका असून घेतलेला निर्णय योग्य आहे. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष राहणार आहे.
- ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.