शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

बारावी परीक्षा न घेताच मूल्यमापन कसे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST

चाळीसगाव विद्यार्थी - शिक्षक, पालक आणि संस्थाचालकांचा सूर लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगावः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गत ...

चाळीसगाव विद्यार्थी - शिक्षक, पालक आणि संस्थाचालकांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगावः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गत महिन्यात इयत्ता १० वीप्रमाणेच १२ वीचीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला असून त्याच्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत गुरुवारी मान्यतेची मोहोर उमटलीही आहे. परीक्षा रद्द झाली तरी काही प्रश्न मात्र अनुत्तरीतच

आहेत. परीक्षा न घेता मूल्यमापन कसे केले जाईल. पुढील प्रवेश कसे होणार. असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थी - पालक, शिक्षक, संस्थाचालक यांच्यामधून उपस्थित होत आहे.

गुरुवारी या पार्श्वभूमीवर 'लोकमत' साधलेल्या संवादातूनही हाच सूर उमटला.

कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहे. तिसऱ्या लाटेच्या घंटा वाजविल्या जात आहे. याचबरोबर १२ वीच्या परीक्षेचाही प्रश्न ऐरणीवर होता. परीक्षा रद्द झाल्याने पुढील पदवी परीक्षेसाठी प्रवेश कसे द्यायचे? गुणदान कसे करायचे? अशा प्रश्नांना आता तोंड फुटले आहे. परीक्षा रद्द झाली असली तरी मूल्यमापन, गुणदान, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश याविषयी स्पष्टपणे सूचना येत नाही तोवर ही चर्चा सुरूच राहणार आहे.

...........

महत्त्वाची चौकट

जिल्ह्यात १२ वीच्या ४९ हजार विद्यार्थ्यांना दिलासा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात नाशिक येथील परीक्षा मंडळाकडे १२वीच्या परीक्षेसाठी

एकूण ४९ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. जवळपास अर्धा लाख विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

१...यावर्षी जिल्ह्यातून इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी ५८ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. गेल्या महिन्यात राज्याच्या शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे या ५८ हजार विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. आता १२ वीचीही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

.......

* पुढील धोरणही जाहीर करावे

कोरोनाच्या रौद्र काळात १२ वीची परीक्षा रद्द करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. पुढील प्रवेशाचे धोरणही जाहीर करावे. म्हणजे गोंधळाची स्थिती दूर होईल. १२ वीची परीक्षा घेणे संस्थाचालकांच्या दृष्टीने जोखमीचेच ठरले असते.

- योगेश रमेशचंद्र अग्रवाल, संचालक, चाळीसगाव एज्यु. सोसायटी.

.........

* प्रवेश परीक्षा अनिवार्य

१२ वीची परीक्षा रद्द झाली आहे. चांगला निर्णय आहे. ही परीक्षा रद्द झाली तरी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य करता येईल. परीक्षा घेऊनच या अभ्यासक्रमांना प्रवेश देणे. योग्य होईल.

- अशोक खलाणे, सचिव, म. फुले शिक्षण मंडळ चाळीसगाव.

...........

* परीक्षा हवीच होती

१२ वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात टर्निंग पाईंट असतो. या टप्प्यावर त्याचे समग्र मूल्यमापन होणे अत्यावश्यक असते. या इयत्तेनंतर उच्च शिक्षणाचे दरवाजेही उघडतात. त्यामुळे परिक्षा होऊन मूल्यमापन होणे गरजेचे होते.

कोरोना काळातील योग्य निर्णय म्हणावा लागेल.

- डॉ. एस. आर. जाधव, प्राचार्य, य.ना. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव.

........

* मूल्यांकन होणेही महत्त्वाचे

कोरोनाची स्थिती भयावह आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून लेखी परीक्षा घेणे उचित ठरले नसते. यादृष्टीने या निर्णयाकडे पहावे लागेल. मूल्यांकन कसे केले जाते. हेही महत्त्वाचे आहे.

- डॉ. मिलिंद बिल्दीकर

प्राचार्य, चाळीसगाव महाविद्यालय

.........

* विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता महत्त्वाची

एका शैक्षणिक टप्प्यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झाले पाहिजे. तथापि कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे. परीक्षेसाठी झालेली गर्दी त्याला निमंत्रण देणारी ठरू शकली असती. शासनाने हे टाळले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार प्राधान्याने केला आहे.

निर्णयाचे स्वागत आहे.

प्रा. वैशाली नितीन पाटील, के.आर. कोतकर ज्युनि. कॉलेज, चाळीसगाव.

........

* मोठे संक्रमण टळले

विद्यार्थ्यांची सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देऊनच १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनाच्या लाटेत परीक्षा घेणे संयुक्तिक ठरले नसते. आत्ता कुठे बाधितांची संख्या आटोक्यात येऊ लागली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी एकत्र आले असते तर साथ रोगाचे संक्रमण वाढण्याला मदतच होणार होती. योग्य पर्याय निवडला शासनाने.

- प्रा. संजय घोडेस्वार

राष्ट्रीय ज्युनि. कॉलेज, चाळीसगाव.

.........

* परीक्षा घेणेच योग्य होते

कोरोनाचा धोका आहेच. मात्र त्याबरोबर विद्यार्थ्यांच्या अध्ययन कौशल्याचे मूल्यमापन होणे महत्वाचे आहे. त्यासाठी परिक्षा रद्द न करता इतर पर्याय वापरुन निर्णय घेणे योग्य झाले असते. बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप वापरुन परिक्षा घेणे शक्य होते. आपण परिक्षा न देता उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मनात तयार होऊ शकतो.

- प्रा. बी. आर. येवले

के.आर.कोतकर ज्युनि. कॉलेज, चाळीसगाव

.........

* परीक्षेमुळे आत्मविश्वास वाढतो

विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत पाठवितांना मागील वर्गात त्याने कितपत कौशल्य मिळविले. हे तपासणे म्हणजेच परीक्षा घेणे. वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी परीक्षा घ्यायलाच हवी होती. अर्थात शासनाने सर्व घटक व परिस्थिती लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला आहे, असे वाटते. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास वाढीस लागतो.

- प्रशांत मदन जोशी

पालक, चाळीसगाव.

......

* विद्यार्थी हिताचा निर्णय

१२ वीची परीक्षा होणार? की नाही होणार? या मोठ्या प्रश्नातून सुटका झाल्यासारखे वाटते आहे. परीक्षा रद्द करणे. हा विद्यार्थी हिताचा निर्णय आहे. आता पुढील दिशा ठरवणे सोपे होणार? आहे. वर्षभरापासून कोरोनामुळे अडचणींचा सामना करून अभ्यास केला. परीक्षा घेण्याची वेळही निघून गेली होती. संक्रमणाचा धोका वाढला असून कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे.

- साहिल रवींद्र खैरे, इयत्ता १२ वी, जयहिंद विद्यालय, चाळीसगाव.

.......

* परीक्षा द्यायला आवडले असते

आम्ही वर्षभर ऑनलाइन आणि ऑफलाइनही जीव तोडून अभ्यास केला आहे. पदवी परीक्षेसाठीदेखील १२ वीची परीक्षा मेरीट की ठरते. त्यामुळे परीक्षा द्यायला आवडले असते. मूल्यमापन कसे होईल. सरसकट निर्णयामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.

- वैष्णवी नामदेव जाधव, इयत्ता १२ वी, के.आर.कोतकर ज्युनि. कॉलेज, चाळीसगाव.

........

* असे आहेत निष्कर्ष

# व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश कसे देणार? ही अनिश्चितता परीक्षा रद्दच्या

निर्णयानंतरही कायम आहे.

# परीक्षेसंबंधी निर्णय घेण्यास राज्य शासनाने बराच उशीर केला.

# यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला.

# परीक्षा रद्द झाली. तथापि, गुणदान कसे करणार ? याबाबत स्पष्टता नाही.

# इयत्ता नववी, दहावी, अकरावीच्या गुणांची सरासरी काढून १२ वीचा निकाल देण्याचा पर्याय आहे.

# गेल्या वर्षी मात्र ११ वीची परिक्षा झालेली नाही.

# ग्रामीण भागातील ऑनलाईन अभ्यासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

..............

महत्वाची चौकट

चाळीसगावच्या कोतकर कॉलेजने घेतली ११ वीची परीक्षा चाळीसगाव एज्यु. सोसायटीच्या के.आर.कोतकर कॉलेजने इयत्ता ११वीची परीक्षा

नुकतीच ऑनलाइन पद्धतीने घेतली. यात प्रविष्ट असणाऱ्या ६७० पैकी ६०० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. याविद्यार्थ्यांच्या निकाल तयार करण्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. यावरून विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्याकडे स्पष्ट कल दिसून येतो, अशी माहिती प्रा. बी.आर.येलले यांनी दिली.