शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना मिळणार हक्काचे घर

By admin | Updated: February 26, 2017 00:52 IST

जळगाव : घरापासून वंचित असलेल्या पोलिसांना लवकरच हक्काचे घर मिळणार असून

जळगाव : घरापासून वंचित असलेल्या पोलिसांना लवकरच हक्काचे घर मिळणार असून मुख्यालयात कर्मचाºयांसाठी २ बीएचकेचे ९५२ तर अधिकाºयांसाठी ३ बीएचकेचे ५६ निवासस्थान यासह विविध कार्यालय व सुविधांसाठी २७५ कोटींचा प्रस्ताव आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या बैठकीत या प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे पोलिसांचे स्वप्न प्रत्यक्षात लवकरच साकार होणार आहे.हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर गेल्या सहा महिन्यापासून पाठपुरावा करीत आहेत. गेल्या आठवड्यातच त्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आले होते.   राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्यामार्फत हे प्रकल्प केले जाणार आहेत. पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) यांच्या निवासस्थानासह डॉग युनीटसाठी १ कोटी ६६ लाख रुपयांचा प्रस्ताव असून त्यात पहिल्या टप्प्यात कार्यालयासाठी ७५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.याच आवारात राखीव पोलीस निरीक्षक, बॉम्ब शोध व नाशक पथकाचे कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय साकारले जाणार आहे. याशिवाय मोटार परिवहन कार्यालय, वर्कशॉप व ८२ चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र शेड उभारले जाणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ.सुपेकर यांनी पुढाकार घेऊन हे प्रस्ताव मार्गी लावले.   पोलीस अधीक्षक कार्यालयाचे नूतनीकरण  पोलीस अधीक्षक कार्यालयाचेही नूतनीकरण केले जाणार असून त्यात कॉन्फरन्स व रेकॉर्ड रुम, मागील बाजूस तीन मजली इमारत उभारली जाणार आहे. त्यात इमारतीत महिला तक्रार निवारण कक्ष, गुन्हे दोष सिध्दी कक्ष, आर्थिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी शाखा, संगणक कक्ष, सीसीटीएनएस कार्यालय, मानव संसाधन विभाग, बिनतारी संदेश कक्ष, १०० व्यक्तींसाठी कॉन्फरन्स सभागृह, १०० जणांचा भोजन कक्ष आदी एकाच छताखाली येणार आहे. कर्मचारी निवासस्थान, कार्यालये, नियंत्रण कक्षासह अनेक प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे पोलीस दलाचा कायापालट होणार आहे. मुंबईतील बैठकीत सविस्तर आराखडा सादर झाला आहे.एकाच छताखाली सर्व कार्यालय येणार असल्याने नागरिकांची सोय होईल. या प्रकल्पासाठी सहा महिन्यापासून पाठपुरावा सुरु होता. आपल्या कार्यकाळात अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागल्याने मोठे समाधान आहे.  -डॉ.जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक