दत्तात्रय हे गावात राहत असलेल्या वडिलांच्या घरी गेले असता अचानक घराला आग लागली, आगीमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. हा प्रकार रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास घडला. यादरम्यान गावात पाऊससुद्धा सुरू होता. ते घरी आले त्यावेळेस घरातून धूर निघत होता. घरातील काही वस्तू आगीत जळून संपूर्ण खाक झाल्या होत्या. त्यामध्ये घरातील एलईडी टीव्ही, फ्रीज, मोबाईल फोन, कपडे, भांडी, पंखा या वस्तूंचे तर अक्षरशः पाणीच होऊन गेले. तसेच दत्तात्रय माळी यांनी शेतीच्या मशागतीसाठी साठवून ठेवलेले वीस हजार रुपये या आगीत जळून गेले. घरी कोणी नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हलका पाऊस पडत असल्याने आजूबाजूला राहणारे सर्व जण घरातच होते, त्यामुळे हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही. लोहारा येथील पोलीस पाटील सुरेंद्र शेळके यांनी पोलीस ठाण्याला कळविला. तलाठी उमेश सोनवणे यांनी पंचनामा केला.
लोहारा येथे घराला आग; संसारोपयोगी वस्तू खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:19 IST