शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यजमान धनाजीनाना महाविद्यालय सजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 23:33 IST

‘युवारंग २०१६’ : सहभागी संघांचा सराव,आकर्षक रंगमंचाची उभारणी, विविध समित्या कार्यरत

फैजपूर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा ‘युवारंग २०१६’ युवक महोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.  युवारंग महोत्सवाचे यजमानपद भूषविणाºया धनाजी नाना महाविद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील ते  एकूण १७ कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदविणार आहे. त्यासाठी  सराव जोमाने सुरू आहे. धनाजी नाना महाविद्यालय व उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागातर्फे १९ ते २३ जानेवारी दरम्यान युवारंग युवक महोत्सव साजरा होत आहे. या युवारंगसाठी महाविद्यालय सज्ज झाले असून महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर मुख्य व्यासपीठ अर्थात रंगमंच असेल. त्यावर अडीच ते तीन हजार विद्यार्थी बसतील एवढा भव्य शामियांना लावण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.  भोजन कक्ष, वैद्यकीय सेवा, अन्य सुविधांसाठी विविध समित्या कार्यरत आहेत.  यजमानपद भूषविणाºया धनाजी नाना महाविद्यालयाचे विद्यार्थी   १७ कला प्रकार सादर करतील. त्यासाठी ४० विद्यार्थ्यांचा सराव सुरू आहे.विडंबन नाट्य, मुकनाट्य, मिमिक्री, समूहनृत्य, समूहगीत, सुगम गायन, लोकगीत, शास्त्रीय नृत्य, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, काव्य वाचन, फोटोग्राफी, रांगोळी, चित्रकला, व्यंगचित्र, क्ले मॉडेलिंग, कोलाज या कला प्रकारांचा समावेश असेल. सहभागी विद्यार्थी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून सराव  घेत आहे.  (वार्ताहर)

जेटीएमचे विद्यार्थीही सहा कला प्रकारात सहभागी होणार४२०१३ मध्ये युवारंगचे यजमान पद भूषविलेल्या जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सात विद्याथीर सहा कला प्रकारात युवारंग २०१६ मध्ये सहभागी होतील. त्यात कोलाज, स्पाट पेटिंग, रांगोळी, वक्तृत्व, वादविवाद, व बासरी वादन या कला प्रकारांचा समावेश असेल. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा.सी.व्ही.चौधरी व प्रा.सपना चौधरी असतील.आज दाखल होणार जिल्ह्याबाहेरील संघ४युवारंग महोत्सवात उमवि कार्यक्षेत्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील संघ सहभागी होतील़ बुधवारी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील संघ दुपारनंतर दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़ जळगावच्या युवारंग मध्ये तीन पदके४येथे होणारा १४ वा युवारंग युवक महोत्सव आहे. १३ वा युवारंग जळगावात झाला़ त्यात धनाजी नाना महाविद्यालयाला सुगम व शास्त्रीय गायन या कला प्रकारात दोन तर क्ले मॉडेलिंग मध्ये एक असे तीन पदके मिळाली होती. 'धनाजी नाना'त        होणार रोशणाई४युवारंग महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या इमारतीवर रोषणाई करण्यात येणार असून एकूणच या ऐतिहासिक भूमीत होणाºया या तिसºया युवारंगमुळे तरुणाईचा उत्साह द्विगुणित होणार आहे.