शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पहूर रूग्णालयात परिचारकास जि.प.सदस्याकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 16:26 IST

तणावाची स्थिती : जि.प.सदस्यांसह चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा

पहूर, ता.जामनेर : केवडेश्वर महादेव मंदिराच्या सभामंडपात बसलेल्या महिलांच्या अंगावर स्लॅबच्या प्लॅस्टरचा मलबा पडल्याने पाच महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. त्यांच्यावर पहूर ग्रामीण रूग्णालयात उपचार करणाऱ्या अधिपरीचारकास अज्ञात चार ते पाच तरुणांसह जि.प.सदस्य अमित देशमुख यांनी मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी दोन महिलांना पुढील उपचारासाठी सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अन्य तीन जणांवर पहूर येथे उपचार सुरू आहे त.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार केवडेश्वर महादेव मंदिरात विवाह सोहळ्याच्या निमित्ताने काही महिला मंदिराच्या सभामंडपात बसलेल्या होत्या. या दरम्यान छताच्या प्लॅस्टरचा थोडासा भाग अचानक काही महिलांच्या अंगावर पडला. यात गिताबाई गजानन मोहाळे ४० रा वाकोद, सुरेखा दीपक मोहाळे ३०, रा वाकोद, रंजना कैलास पाटील ३० रा. बिल्दी, चंद्रभागा भाऊराव देशमुख, ५० पिंपळगाव बु,. प्रयाग भास्कर पाटील रा. पहूर हे जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी पहूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. अधिपरीचारक अविनाश कराड हे जखमींवर उपचार करीत असताना रूग्णालयात जमलेल्या जमावातून संतप्त काही अज्ञातांसोबत कराड यांची शाब्दिक चकमक झाली. त्याचे रूंपातर मारहाणीत झाल्याचे समजते. यामुळे काही काळ रूग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जखमींपैकी गिताबाई मोहाळे व सुरेखा मोहाळे यांना पुढील उपचारासाठी अरविंद देशमुख यांनी जळगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल केले आहे.डॉ. हर्षल महाजन यांना कोणी तरी शिविगाळ व अंगावर धावून आल्याचे स्वत: डॉ.महाजन यांनी सांगितले आहे. याप्रकरणी अविनाश कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात जि.प.सदस्य अमित देशमुख यांच्याससह चार ते पाच जणांना विरुद्ध शासकीय कामात अडथळा , मारहाण व शिविगाळ केली व शासकीय उपकरणांचे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट करीत आहे. दरम्यान, परस्परविरोधी गून्हा दाखल करण्याचे कामरात्री उशिरापर्यंत सुरू होते. हाणामारीच्या घटनेनंतर काही काळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.रूग्णालयात जमाव होता. वैद्यकीय अधिकारी जखमींवर प्रथमोपचार करण्यास विलंब करीत होते. संतप्त रूग्णांचे नातेवाईक प्रथमोपचार करण्याची मागणी करीत होते. पदाधिकारी नात्याने संबंधित अधिपरीचारक यांना सांगत असताना त्यांनी अरेरावी केली. त्याकडे दुर्लक्ष करून उपचार करण्याची मागणी केली. कोणाला मारहाण व शिविगाळ केली. नाही. जाणीव पूर्वक माझे नाव गोवले आहे.- अमित देशमुख, जि.प.सदस्य.४जि.प. सदस्य अमित देशमुख हे जखमींवर उपचार करण्यासाठी अधिपरीचारक अविनाश कराड याला सांगत असताना कराड यांनी देशमुख यांना अरेरावी केली. त्यामुळे वातावरण तापले व काही उपस्थितांमध्ये व कराड यांच्यात शाब्दिक चकमक उडाली असे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले आहे.