शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात भररस्त्यावर दोघांकडून एकाला हॉकीस्टीकने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 21:19 IST

किरकोळ कारणावरुन रमेश श्रावण सोनवणे (वय ४५ रा.बालाजी मंदिरामागे, जळगाव) यांना भररस्त्यावर दोघांकडून हॉकिस्टीकने बेदम मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे चार वाजता गांधी मार्केटच्या समोर घडली. सागर लिलाधर सैंदाणे व किरण लिलाधर सैंदाणे या दोघांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप सोनवणे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

ठळक मुद्दे गांधी मार्केटजवळील घटना रक्तबंबाळ अवस्थेत पाहून हल्लेखोर पसार जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १३ : किरकोळ कारणावरुन रमेश श्रावण सोनवणे (वय ४५ रा.बालाजी मंदिरामागे, जळगाव) यांना भररस्त्यावर दोघांकडून हॉकिस्टीकने बेदम मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडे चार वाजता गांधी मार्केटच्या समोर घडली. सागर लिलाधर सैंदाणे व किरण लिलाधर सैंदाणे या दोघांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप सोनवणे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.याबाबत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश सोनवणे यांची गांधी मार्केटच्या बाहेर रस्त्याच्या कडेला पानटपरी आहे. किरण सैंदाणे हा तरुण व सोनवणे दोघंही एकाच परिसरात राहायला आहेत. मंगळवारी सोनवणे हे दारुच्या नशेत होते, त्यात ते शिवीगाळ करीत असल्याने त्यांचा तेथे एका जणाशी वाद झाला. हा वाद मिटल्यानंतर किरण याच्याशी त्यांचा वाद झाला. दोघांमध्ये शाब्दीक वाद व शिवीगाळ झाल्यानंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी किरण व सागर या दोन्ही भावंडांनी सोनवणे यांना बेदम मारहाण केली. त्यात डोक्यात हॉकीस्टीकचा मार लागल्याने डोक्यातून तसेच नाक व कानातून रक्तस्त्राव झाल्याने ते जागेवरच कोसळले. सोनवणे यांना रक्त बंबाळ अवस्थेत पाहून पळापळ झाली तर काही जणांनी सोनवणे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर लागलीच खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.