शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

चाळीसगाव तालुक्यात बिबटय़ाच्या हल्ल्यात घोडा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:27 IST

अलवाडी गावाजवळची घटना : वनविभागाकडून टेहळणी

ठळक मुद्देभडगाव तालुक्यातील वाडे येथील तिखी बर्डी पिरवाडी शिवारात 20 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबटय़ाने दर्शन दिले. वाडे येथील तिखी बर्डी पिरवाडी शिवारात राजू बाबूराव माळी यांच्या शेतालगत पाझर तलाव आहे. या पाझर तलावात टाकलेले मासे सांभाळणारे हिलाल तावडे, शांताराम माळी यांना बंधा:याच्या भिंतीवरून अंधारातून बिबटय़ा जाताना दिसला. या दोघांची घाबरगुंडी होत त्यांनी आरडओरड केलबॅटरीचा उजेड सोडला. मात्र बिबटय़ा हा शांतपणे चालत होता. अखेर हिलाल तावडे शांताराम माळी यांनी घाबरल्या स्थितीत मोटारसायकलने घरचा रस्ता धरला, अशी माहिती हिलाल तावडे यांनी दिली. पिरवाडी परिसरात तिखीबर्डी वस्ती आहे. त्यात शेतांमध्ये शेतकरी, मजुरांमध्ये भीतीचे

ऑनलाईन लोकमत चाळीसगाव, जि.जळगाव, दि.21 : अलवाडी गावाजवळ माळरानावर मेंढय़ांच्या कळपाशेजारी बांधलेल्या घोडय़ावर मंगळवारी पहाटे बिबटय़ाने हल्ला केला. यात घोडा ठार झाला. दुपारी वनविभागाने या परिसरात ड्रोन कॅमे:याव्दारे बिबटय़ाचा शोध घेतला. मात्र नेहमीप्रमाणेच तो अदृश्य झाला. दरम्यान, भडगाव तालुक्यातील वाडे येथे बिबटय़ा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलवाडी गावाजवळ बाबूलाल धनगर यांचा मेंढय़ांचा कळप आहे. गावापासून हे अंतर अवघे अर्धा किलोमीटर आहे. मंगळवारी पहाटे एक वाजता बिबटय़ाने घोडय़ावर हल्ला करीत त्याच्या मानेचा चावा घेतला. हल्ला होताच घोडा दोर तोडून दोन किलोमीटर अंतरापयर्र्त पळाला. बिबटय़ाने पुन्हा त्याच्यावर झडप घालत त्याला ठार केले. यानंतर त्याने घोडय़ाच्या मानेचे आणि पोटाच्या भागाचे लचके तोडले. सकाळी बाबूलाल धनगर यांना आपला घोडा मृत स्थितीत आढळला. चाळीसगाव प्रादेशिक वनविभागाचे संजय मोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर पंचनामा करण्यात आला. वनविभागाने दुपारपयर्ंत याच परिसरात शोधमोहीम राबवली. दरम्यान, बिबटय़ाने घोडय़ाला ठार केल्याने अलवाडी परिसरात नागरिकांमध्ये भीती पसरली. या भागातही पिंजरे लावून वनगस्त सुरु करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.