शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कुंडली मुहूर्त

By admin | Updated: May 19, 2017 12:01 IST

केतू, आता घराचा उंबरठा तुङया पदस्पर्शासाठी आसुसला आहे

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 19 - प्रिय केतू, सप्रेम आठवण, ममा-पपांच्या लगAाच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छादेखील देऊ शकलो नाही. रविवारी नीरज घरी आला तेव्हाच कोल्हापूरहून ममांचा फोन आला. त्याचवेळी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. पपा नव्हतेच. ते बहुधा ऑफिसला गेले असावेत. नीरजच्या दृष्टिकोनातून पत्रिका (स्वागत सोहळ्याची) नीट प्रिंट झाली नाही. त्यावरचा गोल्ड अजिबात नीट प्रिंट झालेला नव्हता. नीरज प्रेसवाल्यांना विचारायला जाणार होता.  केतू, त्यातला मजकूर, व्हिज्युअल इतके जोरदार आणि बराच वेळ गुंगवून ठेवणारे आहे की; नीरज म्हणतो, त्या उणिवांकडे कुणाचे लक्षच जाणार नाही.माझी साहित्यिक मैत्रीण अरुणा ढेरे यांना  तुमच्या विवाहाबद्दल सांगितले. ती फारच आनंदून गेली. 30/35 वर्षापूर्वीची ही मैत्रीण. हिचे वडील म्हणजे थोर इतिहास संशोधक रा.चिं. ढेरे. आम्ही 30 वर्षापूर्वी त्यांच्या शनिवारपेठेतल्या घरी जायचो. त्यांच्या घरच्या भिंती या पुस्तकांच्याच होत्या. त्या घरात आम्हा मित्रांना संकोच कधी वाटला नाही, इतकी घरातील माणसे ऋजू आणि स्वागतशील होती. माझा गोव्याचा मित्र, तसेच कोलकात्याहून येणारा संकेत हा तुमच्या पिढीचा आहे. पण माझा मित्र आहे. तो आपल्या घरचा सदस्यच आहे. त्याचे घर जळगावी आहेच. तो आठ  दिवस रजा घेऊन येतोय. तो स्वागत सोहळ्यालाही असणार आहे. माङो लवकर जाग येण्याचे सत्र सुरूच आहे. कामांच्या व्यस्ततेत वेळ मात्र सार्थकी लागतो आहे. मोठय़ा घरचा संदीप ऑफिसला जाण्यापूर्वी रोज एक चक्कर टाकतोय. मांडवाचे रूप आता बरेचसे स्पष्ट होत आहे.  दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या नव्या (शोध स्वामी विवेकानंदांचा) पुस्तकाचा परिचय वाचनात आला. भविष्य आणि ग्रहविद्येवर प्रहार करताना विवेकानंद म्हणतात, ‘आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणा:या माणसाच्या जीवनावर परिणाम करतात, असे मानणे हा भंपकपणा आहे. मानवी समाजाचे अपरंपार नुकसान करणारा, मानवी मनाला होणारा तो एक रोग आहे’ असे म्हणून त्यांनी कुंडली-मुहूर्त या सा:याच गोष्टी निकाली काढल्या आहेत.तुङो आजोबा अण्णा विचारतात, आपली भेट केव्हा? तेव्हा वाटले होते लगAाआधी भेट होईल, पण ते राहिलेच. केतू लहानची मोठी ज्या घरात झाली, ते घर पाहायचे राहूनच गेले. आता तेही नंतरच. केतू, आता घराचा उंबरठा तुङया पदस्पर्शासाठी आसुसला आहे. अच्छा!तुङो आई-बाबा.- जयंत पाटील