शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आशा कर्मचाऱ्यांना मानधनवाढ मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 21:52 IST

चोपडा : निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आशा गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा प्रश्न शासनाने सोडवावा, अशी मागणी आशा गटप्रवर्तकांनी ...

चोपडा : निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आशा गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा प्रश्न शासनाने सोडवावा, अशी मागणी आशा गटप्रवर्तकांनी केली आहे. यासह इतर मागण्यांसाठी तहसीलदारांना २ रोजी निवेदन सादर करण्यात आले.येथे २ सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयावर सकाळी ११ वाजता आशा कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी आयटकचे राज्य उपाध्यक्ष, कामगार नेते अमृतराव महाजन उपस्थित होते. नायब तहसीलदार राजेश पऊळ यांना १७ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ‘आशां’ना तेलंगणा राज्याप्रमाणे किमान १० हजार रुपये मानधन व किमान ६ हजार पेन्शन द्यावे. मानधनवाढीचा रखडलेला आदेश काढावा. एकछत्री योजना अमलात आणावी, १२०० रुपये स्टेशनरी खर्च मिळावा तसेच मे महिन्यापासूनचा थकीत मोबदला द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे पदाधिकारी अमृतराव महाजन यांच्यासह शैला परदेशी, मीनाक्षी सोनवणे, संगिता पाटील, मनिषा पाटील, संजना विसावे, पल्लवी सोनवणे, अनिति पाटील, कल्पना महाले, ललिता भादले, योगिता कोळी, रेखा पाटील, वनिता मोरे, शितल पाटील, संगिता पाटील, ज्योती चित्रकथी, संजना विसावे, आदींनी केले आहे.