जळगाव : येथील अंजुमन तालिमुल मुस्लेमीन संचलित एम.ए.आर. अँग्लो उर्दु हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गफ्फार मलिक, सचिव अमीन बादलीवाला, प्राचार्य डॉ. बाबु शेख, शकील कुरेशी, डॉ. पाकिजा पटेल, खालिद जहागिरदार उपस्थित होते.
यावेळी तंजिला अख्तर, अबुजर रफीक, आलिया मुजावर, मुनज्जा बागवान, आयेशा सिद्दीकी, मलिक सदफ फैसल, नुर फातेमा काझी, अरहम वली अहेमद, कामरान हारुन शेख, सैयद शेहदाद, शेख नवाज, आलिया मुजावर या गुणवान विद्यार्थ्यांचा तसेच डॉ. पाकिजा उस्मान पटेल आणि डॉ. उस्मान पटेल यांचा समाजकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी सैयद चांद, सैयद आमीर, प्रेमाबाई जैन उर्दु शाळेचे मुख्याध्यापक जाकीर हुसेन, मुख्याध्यापक जुबैर शेख, साजीद उपस्थित होते. सुत्रसंचलन शफीक सिद्दीकी यांनी तर आभार एस.एम. फारुक यांनी केले.
फोटो - गुणवंत विद्यार्थ्यांसह बाबु शेख, एस.एम. फारुक, आमीन बादलीवाला, गफ्फार मलिक, डॉ. उस्मान पटेल, डॉ.पाकिजा पटेल आणि मान्यवर.