शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

घराचे दुकान करून, मांडला लग्नाचा बस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बळीराम पेठ भागातील एका घरातच कपड्यांचे दुकान थाटून त्याठिकाणी लग्नाचा बस्ता खरेदी करण्याचा कार्यक्रम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बळीराम पेठ भागातील एका घरातच कपड्यांचे दुकान थाटून त्याठिकाणी लग्नाचा बस्ता खरेदी करण्याचा कार्यक्रम मंगळवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने उधळून लावला आहे. तसेच संबंधित घरमालकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. या भागातील ८ दुकानेदेखील सील करण्यात आली आहेत.

३१ मे पर्यंत शहरातील अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. मंगळवारी बळीराम पेठ भागातील एका कपड्याच्या दुकानावर असलेल्या घरात, दुकानातून आणलेला माल त्या घरात ग्राहकांना बोलावून कपड्यांची विक्री केली जात असल्याची तक्रार मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने या घरात अचानक धाड टाकली. यावेळी घरात चक्क लग्नाचा बस्ता खरेदीचा कार्यक्रम सुरू असल्याचे आढळून आले. याठिकाणी एकाच वेळी या घरात २० हून अधिक ग्राहक देखील आढळून आले. मनपाच्या पथकाने अचानक धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर ग्राहकांनी बस्ता सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनपा कर्मचाऱ्यांनी मुख्य द्वार बंद करून सर्व ग्राहकांना देखील प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासह मनपाच्या पथकाने संबंधित घर मालक व दुकानदाराला देखील प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावून दुकान देखील सील केले आहे.

हरिविठ्ठल नगरचा बाजारही उठवला ; विक्रेत्यांवर कारवाई

मंगळवारी शहरातील हरिविठ्ठल नगर भागात सायंकाळी भाजीपाला बाजार भरला जातो. मात्र सायंकाळी मनपाकडून कारवाई होत असल्याने मंगळवारी हा बाजार सकाळी भरविण्यात आला होता. तसेच या ठिकाणी १०० हून अधिक विक्रेत्यांनी आपले दुकाने थाटली होती. याबाबत या भागातील नागरिकांनी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे तक्रार केल्यानंतर, सकाळी १० वाजता मनपाचे पथक या ठिकाणी दाखल झाले. मनपा पथक आल्यानंतर या बाजारात एकच गोंधळ उडाला. विक्रेत्यांनी आपला माल जमा करून या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला, यामध्ये काही विक्रेत्यांचा माल मनपाच्या पथकाने जप्त केला आहे. माल जप्त केल्याने काही विक्रेते व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये या ठिकाणी वाद देखील झाला. मात्र रामानंद नगर पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन हा बाजार पूर्णपणे उठवला. या ठिकाणी ३० हून अधिक विक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला आहे.

८ दुकाने सील, बळीराम पेठेत पुन्हा गर्दी

सोमवारी शहरातील बळीराम पेठ भागात मनपा व पोलीस प्रशासनाने आपली पथके तैनात केले त्यामुळे गर्दीवर काही अंशी नियंत्रण आणले होते. मात्र मंगळवारी बळीराम पेठ भागात पुन्हा काही भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. मनपा कर्मचार्‍यांनी या ठिकाणी जाऊन ही दुकाने हटविण्याच्या सूचना दिल्यानंतर भाजीपाला विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद केला. मात्र बळीराम पेठ भागात काही दुकानदारांनी लपून छपून व्यवसाय सुरू ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर मनपाकडून या भागातील ८ दुकाने सील केली आहेत. तसेच प्रत्येक दुकानदाराला पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठवले आहे.