शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर महिन्यात घरांची खरेदी विक्री जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनानंतरच्या काळात खरेदी विक्रीच्या व्यवहारांना आता वेग मिळत असला तरी डिसेंबर महिन्यात चलन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनानंतरच्या काळात खरेदी विक्रीच्या व्यवहारांना आता वेग मिळत असला तरी डिसेंबर महिन्यात चलन जमा केल्यावर पुढील चार महिने मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहारात तीन टक्के सुट मिळणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात चलन जमा करून दस्त नोंदणी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. या एकाच महिन्यात १३ हजार ७८४ दस्त नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाला तब्बल २० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क देखील मिळाले.

या चालु आर्थिक वर्षात कोरोनामुळे सुरूवातीच्या महिन्यात मोठा फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे व्यवहार बंदच होते. मात्र त्यानंतर हळुहळु व्यवहार सुरू झाले. मे महिन्यात काही प्रमाणात व्यवहार होत होते. मात्र शासनाने डिसेंबर महिन्यात व्यवहार करणाऱ्यांना तीन टक्के सुट देण्यात आली आहे. असे असले तरी जानेवारीपासून एक टक्के मुद्रांक शुल्कात वाढ होत आहे. त्याचा परिणाम देखील दिसून आला आहे. त्यात ज्यांनी डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क भरून चलन घेतले आहे. त्यांना मार्च महिन्यापर्यंत आपले खरेदी विक्रीचे व्यवहार पुर्ण करता येणार आहे.

अधिकाऱ्याचा कोट

शासनाने डिसेंबर अखेरीस मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करणाऱ्यांना तीन टक्के सुट दिली होती. त्याचा फायदा मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना होत आहे. यामुळे देखील डिसेंबर महिन्यात दस्त नोंदणी जास्त झाली आहे. - सुनिल पाटील, सहदुय्यम निबंधक, मुद्रांक, जळगाव

डिसेंबर महिन्यात २० कोटींचा महसुल

जिल्हाभरात सप्टेंबर महिन्यात १३.२४ कोटी ऑक्टोबरमध्ये १४.८० कोटी, नोव्हेंबरमध्ये १५.२० कोटी आणि डिसेंबर महिन्यात २० कोटी रुपयांचा महसुल शासनाला मिळाला आहे. त्यात निबंधक कार्यालय क्रमांक एकमध्ये ५७५, जळगाव २ मध्ये १३०५, जळगाव तीनमध्ये ७५४, जामनेर ७२४, पाचोरा ९३८, चाळीसगाव ५८५, भुसावळ ८७७, अमळनेर ९६९, चोपडा ८४६, बोदवड ५४६, पहुल ४४७, धरणगाव ६१७, भडगाव ५७४, पारोळा ७८६, चाळीसगाव कार्यालय दोन ८३०, एरंडोल ७००, सावदा ६१२, यावल ३२७, रावेर ४२९, मुक्ताईनगर ३४३ अशी दस्त नोंदणी झाली आहे.

आकडेवारी

डिसेंबर महिन्यात झालेले खरेदीविक्रीचे व्यवहार १३,७८४

महिन्यानुसार झालेले खरेदीविक्रीचे व्यवहार

एप्रिल : ०

मे २३५१

जून ५४८५

जुलै ६०३७

ऑगस्ट ५९१३

सप्टेंबर ६९४७

ऑक्टोबर ६८४४

नोव्हेंबर ८००४

डिसेंबर १३७८४