शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

मुस्लीम बांधवांंच्या पवित्र रमजान महिन्याला शनिवारी प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 15:34 IST

मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला चंद्रदर्शनानंतर शनिवार, दि.२५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे.

ठळक मुद्देकसोटी पाहणारे रोजे लॉकडाऊनमुळे मशिदी दिसणार सुन्यासुन्या

सय्यद लियाकतजामनेर, जि.जळगाव : मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला चंद्रदर्शनानंतर शनिवार, दि.२५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हात येणारे हे रोजे रोजेदारांची चांगलीच कसोटी पाहणारे ठरणार आहेत. एरवी रमजानचा महिना म्हटलं की प्रार्थनांचा महिना, पवित्र महिना, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मशिदींमध्ये भाविकांची गर्दी व उत्साह दिसून येतो. यंदा मात्र कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रथमच रमजानच्या महिन्यात मशिदीही सुन्यासुन्या दिसणार आहेत.मुस्लीम समाजामध्ये वर्षाच्या १२ महिन्यांपैकी रमजानचा महिना विशेष पवित्र मानला जातो. याच महिन्यात पवित्र धर्मग्रंथ कुराण अवतरीत झाल्याचे सांगितले जाते. प्रत्येक मुस्लीम स्त्री पुरुषांवर धर्मानुुसार ज्या पाच गोष्टी अनिवार्य करण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे रमजान महिन्याचे ३० रोजे (उपवास) ठेवणे बंधनकारक आहे. वर्षाच्या प्रत्येक ऋतूत १२ महिने येणारे हे रोजे मागील दोन वर्षांपासून उन्हाळ्यात येत आहेत. उन्हाळ्यातील रोजे हे रोजेदारांची खरी कसोटी पाहणारे ठरत असतात. कारण रोजा ठेवल्यानंतर संपूर्ण दिवसभर तब्बल १४ तास अन्नपाण्यावाचून राहावे लागते. ऋतू कोणताही असो मुस्लीम समाजातील सात वर्षाच्या मुलांपासून आबालवृद्ध रोजे धरतात. रमजान महिना म्हटला की, पहाटेच्या सहरपासून संध्याकाळी इफ्तारपर्यंत भाविकांच्या उत्साहाला एकच उधाण आले असते. मात्र यावर्षी रमजानच्या महिन्यावरही कोरोनाचे सावट असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. तरीही आपापल्या घरात राहून रमजानमधील सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी मुस्लीम बांधवांनी तयारी केली आहे.संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने सर्वांनी लॉकडाऊन पाळायचे आहे. सर्व मुस्लीम बांधवांनी रमजानचे रोजे ठेवून या महिन्यातील विशेष नमाज तरावीसह सर्व नमाज वेळेवर घरातच पार पाडायच्या आहेत. अल्लाहने आपल्याला यावर्षी पवित्र महिन्याच्या इबादतीसाठी भरपूर वेळ दिला आहे. त्याचा सदुपयोग करून रोजा, नमाज कुराण पठण, जकात आदी धार्मिक विधी भक्तीभावांनी सर्वांनी अदा करावेत. तसेच गरीब बांधवांच्या अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनाही मदत करून अधिकचे पुण्य कमवून घ्यावे.-मौलाना इम्रान मजाहेरी, जामनेरकोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. यामुळे मुस्लीम बांधवांनी रमजानचे रोजे ठेवून घरातच नमाज पार पाडावी व प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच संपूर्ण देशातून या महामारीचा लवकरच नायनाट व्हावा, म्हणून सर्वांनी या महिन्यात विशेष दुआ करावी.-प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक, जामनेरमुस्लीम बांधवांच्या रमजान महिन्याची सुरुवात २५ एप्रिलपासून होणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार होऊ नये व लॉकडाऊनमधील सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.-अरुण शेवाळे, तहसीलदार, जामनेर. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर