शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ममुराबादजवळ महामार्गाचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने, महामार्गाच्या कामाची चांगलीच दाणादाण उडविली आहे. शहराच्या बाहेरून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने, महामार्गाच्या कामाची चांगलीच दाणादाण उडविली आहे. शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायापासच्या कामावर या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. त्या महामार्गाच्या कामासाठी ममुराबादजवळ लेंडी नाल्याच्या वर पाइप टाकून कच्चा पूल बांधण्यात आला होता. मात्र, या कच्च्या पुलावर टाकलेला माती आणि मुरुमाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे अनेक रस्त्याच्या कामात अडचणी येत आहेत.

तरसोद ते फागणे या महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात गेल्या काही दिवसांपासून अनेक अडथळे येत आहेत. हा टप्पा ९० किमीचा आहे. त्याची किंमत १,०२२ कोटी रुपये आहे. कोविड १९ मुळे दोन वेळा अडचणी आल्या. त्यामुळे सुरू असलेल्या सर्वच कामांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली. हे काम आधीच संथ गतीने सुरू आहे, तसेच काही महिने आधी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला महामार्ग प्राधिकरणाने दंड ठोठावला होता. त्यानंतर, कामात गती आली. मात्र, लगेचच लॉकडाऊन लागले. त्यात मजूर गावी परतल्याने, या रस्त्याचे काम पुन्हा एकदा संथ गतीने होऊ लागले. आता रविवारच्या पावसाने बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

कचरा अडकला पाइपमध्ये

शहरातील निम्म्यापेक्षा जास्त सांडपाणी लेंडी नाल्यात सोडले जात होते. बायपास रस्त्यात हा नालाही येतो. त्यामुळे तेथे लहान पूल बांधावा लागणार आहे. ठेकेदाराने या लेंडी नाल्यावर तात्पुरत्या स्वरूपात पाइप टाकले आणि वर मुरुम टाकून रस्ता केला होता. मात्र, शहरातून आलेले प्लास्टीक आणि इतर कचरा या पाइपमध्ये अडकला आणि पाण्याच्या लोंढ्याने वर असलेला सगळा मुरुम वाहून नेला आहे.

शेतांमध्ये गेले नाल्याचे पाणी

नाला ओलांडण्यासाठी जेथे पुल केला जाणार आहे. तेथे सध्या महामार्ग प्राधिकरणाने चार ते पाच सिमेंटचे ड्रेनेज पाइप टाकले आहे. मात्र, या पाइपमध्येही कचरा अडकला. त्यामुळे येथे पाणी साठले आणि हेच पाणी आसपासच्या काही शेतांमध्येही शिरले.