शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील कर्मचाऱ्याचा पाईपात अडकून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 18:04 IST

दुर्घटना : वाघूर नदीत पाय सटकल्यावर काळाचा घाला

भुसावळ :-महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यासाठी नदीपात्रातून करण्यात आलेल्या तात्पुरत्या रस्त्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईपात अडकून महामार्गावरील कर्मचाºयाचा मृत्यू ओढवला आहे.महामार्ग चौपदरीकरणाच्या कायार्साठी वेल्डिंग सेक्शन मधील वेल्डर पदावर कार्य करणारा दिल्ली येथील मूळ रहिवासी लालबाबू पंडित (४५) हा कामासाठी नदीपात्रात पाणी घेण्यासाठी गेला असता तेथेच त्याचा पाय निसटला व तो सरळ नदीपात्रात टाकलेल्या पाईपात जाऊन अडकला. शेवाळ असल्या कारणाने लालबाबू पाइपातून आरपार बाहेर येऊ शकला नाही व पाय सरळ छातीला लागून गोलाकार स्थितीमध्ये गुदमरून अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र मात्र साकेगाव मधील एखादी व्यक्ती याठिकाणी अडकली असती तर या विचाराने साकेगाव मध्ये संतप्त संताप व्यक्त करण्यात येत आहे.नदीपात्रातून तयार करण्यात आलेल्या रस्त्याची परवानगी नाही?महामार्ग अधिकाऱ्यांनी पुलाचे कार्य सोपे व्हावे याकरिता वाघूर नदीपात्रातून रस्ता तयार केला आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा याकरिता नदीमध्ये तयार करण्यात आलेल्या रस्त्यात ठिकठिकाणी सिमेंटचे पाईप टाकण्यात टाकण्यात आले आहे, याठिकाणी साकेगावकर नेहमी अंघोळीसाठी व महिला कपडे धुण्यासाठी तसेच मासेमारी व्यवसाय करणारे मासे पकडण्यासाठी येत असतात अशा परिस्थितीमध्ये कोणी पाईपात अडकले तर त्यास कोण जबाबदार राहील ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विनापरवानगी तयार करण्यात आलेल्या रस्त्यामध्ये आकाराने मोठे पाईप जर टाकले असते तर सदर व्यक्ती पाईप मधून बाहेर आला असता व त्याचे प्राण वाचू शकले असते, मात्र पाईपाची रुंदी अत्यंत कमी असल्यामुळे कर्मचाºयाचा मृत्यू ओढवला आहे.मुलीचे होणार होते लग्न..मयत लालबाबू यांच्या मुलीचे लग्न ठरलं ठरले होते यातच काळाने त्याच्यावर घाला घातला. दरम्यान त्याचे कामावरचे सहकारी यांनी माणुसकीच्या नात्याने मुलीच्या लग्न कार्याची जबाबदारी उचलली असून सर्वांच्या सहकार्याने आर्थिक मदत केली जाणार असल्याचे अधिकारी देवेंद्र महाडिक यांनी सांगितले.याबाबत नशिराबाद नशिराबाद पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.