शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या बायपासचे काम वर्षभरात पुर्ण होण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:11 IST

जळगाव : शहराला वळसा घालून जाणाऱ्या बायपासचे काम आता वेगाने सुरू आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळात या बायपासच्या कामाचा वेग ...

जळगाव : शहराला वळसा घालून जाणाऱ्या बायपासचे काम आता वेगाने सुरू आहे. मध्यंतरी कोरोनाच्या काळात या बायपासच्या कामाचा वेग मंदावला होता. मात्र आता पुन्हा हे काम वेगाने सुरू झाले आहे.

तरसोद ते फागणे हे काम जळगावच्या राष्ट्रीय प्राधिकरण महामार्गाच्या अंतर्गत येते. त्यामुळे हा टप्पा ८७.३ किमीचा आहे. त्यामुळे या कामासाठी अडीच वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्या काळात हा प्रकल्प पूर्ण होणार नसल्याने त्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे पाठ‌ण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी एकदम १०२१ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. त्याचे काम आता वेगात सुरू असून, आव्हाणे, तरसोद शिवारातील कामांना वेग आला आहे. ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या नियोजनानुसार हे काम आता वर्षभर चालणार आहे. २०२२च्या जानेवारी महिन्यात या ठेकेदाराला मिळणारी नवी मुदतदेखील संपेल. त्यामुळे तोपर्यंत हा बायपास वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.

हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यास शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. सद्य स्थितीत या महामार्गाचेही चौपदरीकरण केले जात आहे. त्यामुळे शहरात समस्या उद्भवल्या आहेत.

महामार्गाचे चौपदरीकरण ठरले शाप

शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे सध्या चौपदरीकरण सुरू आहे. हरयाणाच्या एका ठेकेदाराने ही निविदा घेतली असून, काम सुरू आहे. मात्र, त्यातून होणारे अपघात काही थांबण्याचे नाव घेत नाहीत आणि अद्यापही कामाला हवा तसा वेग येत नाही. कोविडच्या काळात काम बंद होते. आता पुन्हा काम सुरू झाले आहे. मार्च २०२१मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या या मार्गावर दादावाडी, गुजराल पेट्रोल पंप, प्रभात चौक येथे भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे.

चेंज ऑफ स्कोपचा वाद

महामार्गाचा ठेका ६८ कोटी १० लाख रुपयांत देण्यात आला होता. या प्रकल्पामध्ये नंतर बदल झाल्यास १० टक्के रक्कम ही वापरता येते. त्यानुसार चेंज ऑफ स्कोपची दहा टक्के रक्कम ही ६.८ कोटी रुपये होते. या रकमेत सालार नगर, अग्रवाल चौक आणि शिव कॉलनी येथे भुयारी मार्ग करून देण्याचे आश्वासन खासदार उन्मेश पाटील यांनी दिले होते. मात्र, या रकमेत हे तीनही भुयारी मार्ग बसणार नाहीत. याचा विचार त्यावेळी कुणीही केला नाही. आता या रकमेत फक्त शिव कॉलनी येथेच भुयारी मार्ग होणार आहे, तर अग्रवाल चौकात फक्त एक बॉक्स बसवला जाणार आहे. सालार नगर येथे भुयारी मार्गासाठी जवळपास १३ कोटी रुपये लागणार आहेत.