दीपनगर, ता.भुसावळ, जि.जळगाव : मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र्र हे रोज नवनवीन उच्चांक प्रस्थापित करीत आहे. ३ डिसेंबर रोजी कोळसा हाताळणी विभागाने विक्रमी कोळसाच्या १६५ वॅगन आठ तासांत रिकाम्या करून ११,२२० टन कोळसा विलंब शुक्ल न लागता, अनलोड करून विक्रम प्रस्थापित केला.महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक चंद्र्रकांत थोटवे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाच कलमी कार्यक्रमांंतर्गत कोळसा हाताळणी विभागाने ८ रोजी अजून एक नवीन विक्रम प्रस्थपित करून सतत कोळशाचा ३०० वॅगन विलंब शुक्ल न लागता रिकाम्या केल्या. हा महानिर्मितीमधील एक अनोखा विक्रम कोळसा हाताळणी विभागाने केला. तसेच ५०० मेगावॅटचा संच क्रमांक पाच हा सतत ३६५ दिवस बाष्पक ट्यूब लिकेज न होता अविरत सुरू आहे. यासाठी कोळसा हाताळणी विभागातील तसेच बॉयलर व संचलन विभागातील सर्व अभियंते/कर्मचारी, कंत्राटदार, कर्मचारी यांचे योगदान आहे म्हणून मुख्य अभियंता पंकज सपाटे, उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर, नंदकिशोर देशमुख, अधीक्षक अभियंता मधुकर पेटकर, मदन अहिरकर यांनी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले. यासाठी हेमंत लहाने व परिमल रामटेके यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी राजेंद्र निकम यांनी ‘लोकमत’ला दिली.
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचा उच्चांक प्रस्थापित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 19:05 IST
दीपनगर, ता.भुसावळ, जि.जळगाव : मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र्र हे रोज नवनवीन उच्चांक ...
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचा उच्चांक प्रस्थापित
ठळक मुद्देकोळशाच्या १६५ वॅगन केल्या आठ तासात रिकाम्याकोणताही विलंब शुल्क न लागता, अनलोड करून कोळसा केला खाली