शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सेवाशुल्काची जादा वसूल रक्कम उद्योजकांना परत देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 11:49 IST

‘एमआयडीसी’ला दणका

ठळक मुद्देउद्योजकांचे 80 ते 100 कोटी द्यावे लागणारशासनासह महामंडळ अधिका:यांविरोधात याचिका

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10 - उद्योजकांकडून दीड रुपये प्रति चौरस मीटर वरुन  10            रुपये प्रति चौरस मीटर सेवाशुल्क  वसूल करणा:या महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाला ही जास्तीची रक्कम उद्योजकांना परत करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्याची माहिती दी इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडिस्ट्रीजचे अध्यक्ष श्यामसुंदर अगरवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़ खंडपीठाचा हा निकाल म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाला दणका मानला जात आहे.पत्रकार परिषदेला पीव्हीसी पाईप असोसिएशनचे ज्येष्ठ सल्लागार कंवरलाल संघवी, वकील अॅड़ अजय तल्हार उपस्थित होत़े महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी येथील औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व पथदिवे दुरुस्तीकरण्यासाठी येणा:या खर्चाच्या वसुलीसाठी औद्योगिक भुखंडधारकांकडून 10 रुपये प्रति चौरस मीटर या दराने दहा वर्ष सेवा शुल्क आकारण्याचे आदेश पारित केले होत़े या आदेशाविरोधात उद्योजकांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत फेडरेशन स्थापन करुन खंडपीठात याचिका दाखल केली होती़महामंडळाच्या या बेकायदेशीरित्या काढलेल्या आदेशाविरोधात  1500 ते 1600 उद्योजकांच्या वतीने फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शामसुंदर अगरवाल यांनी अॅड़ विजय तल्हार यांच्यामार्फत राज्यशासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई येथील मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता व जळगाव येथील महामंडळाचे उपकार्यकारी अभियंता यांच्या विरोधात उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्र ़5964/2008 दाखल करुन आव्हान दिले होत़े

खंडपीठाने दिलेला निकाल असामहाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा 1961 चे व नियम 1962 च्या तरतुदींचा सखोल विचार करुन उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती आऱडी़धानुका व न्यायमूर्ती सुनील कोतवाल यांनी हा निकाल दिला़ यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे कायद्याच्या तरतुदीनुसार दुरुस्ती करुनच सेवा शुल्क वसूल करु शकत़े परिपत्रकाव्दारे सेवा शुल्कामध्ये वाढ करण्याचा महामंडळास कुठलाही कायदेशीर अधिकार नाही़ भुखंडधारकांकडून कायदेशीर तरतुदीनुसारच महामंडळाने सेवाशुल्क वसूल कराव़े तसेच महामंडळाने बेकायदेशीररित्या वसूल केलेल्या शुल्काचा परतावा भूखंडधारक महामंडळाकडे मागू शकतील़ महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने जळगाव एमआयडीसीतील 1500 ते 1600 उद्योजकांकडून दीड रुपयांऐवजी दहा रुपये प्रतिचौरस मीटर प्रमाणे सेवाशुल्क वसूल केल़े  खंडपीठाच्या निकालानुसार महामंडळाला सर्व उद्योजकांची एकूण 80 ते 100 कोटींची रक्कम परत करावी लागणार आह़े खंडपीठाचा निकाल हा जळगाव एमआयडीसीप्रमाणेच राज्यभरासाठी लागू झाला असून त्याचे दूरगामी परिणाम होतील, असेही श्यामसुंदर अगरवाल यांनी पत्रपरिषदेत  सांगितल़ेसुविधा मिळण्यासाठी दाखल केली होती याचिका़़़ महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने 1989 मध्ये औद्योगिक वसाहत ही नगरपालिकेकडे हस्तांतरीत केली होती़ मात्र नगरपालिकेकडून कुठलीही सेवा-सुविधा न मिळाल्याने अध्यक्ष श्यामसुंदर अगरवाल यांनी 2003 मध्ये महामंडळ व नगरपालिका विरोधात खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यावर खंडपीठाने औद्योगिक वसाहतीत महामंडळाने आवश्यक सर्व सेवा तातडीने पुरविण्याचे आदेश दिले होत़े