शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम् गणेशला सहाव्यांदा सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 16:57 IST

दहिगावातील खळबळजनक प्रकार

ठळक मुद्देसहा वेळा सर्पदंशाच्या घटनेने कुटुंबियांच्या मनात निर्माण झाली भीतीदोन वेळा नैसर्गिक विधीस बसला असताना सर्पदंशशनिवारी घरातीलच लाकूड काढीत असताना उजव्या पायाच्या टाचेवर झाला सर्पदंश

ऑनलाईन लोकमत दहिगाव,ता.यावल, दि.26 - साप हा सुड घेत असल्याबाबत अनेकांच्या मनात भीती असली तरी  यावल तालुक्यातील दहिगाव येथील गणेश मिस्त्री या तरुणाला सहाव्यांदा सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.दहिगाव येथीलगणेश देवीदास मिस्त्री (40) यांची परिस्थिती गरीबीची आहे. त्यांना यापूर्वी पाच वेळा सर्पदंश झाला. पाच वेळा जिल्हा रुग्णालयात प्रत्येकी तीन दिवस औषधोपचार होवून घरी सुखरुप आला व तत्काळ आपल्या कामास प्रारंभ केला. फेब्रुवारी 17,  17 एप्रिल रोजी नैसर्गिक विधीसाठी  गेला असता केळी  बागेत 12 मे रोजी भोकरच्या झाडाखाली सरपण काढीत असताना 24 मे रोजी बाथरुममध्ये आणि 16 जून 17 रोजी घरातच पाणी प्राशन करीत असताना पायावर सर्पदंश झाला होता. शनिवारी दुपारी 12 वाजता घरातीलच मागील भागात लाकूड काढीत असताना उजव्या पायाच्या टाचेवरील भागास तीन फूट लांबीच्या व काळय़ा रंगाच्या सापाने चावा घेतला. गणेशला कुटुंबियांनी त्वरीत यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करीत उपचार केले. पुढील उपचारासाठी जळगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. गणेश यांना सहा पैकी दोन वेळा नैसर्गिक विधीस  बसला असताना व एक वेळेस घराजवळ आणि तीन वेळा घरातच एकाच जागेवर सापाने चावा घेतला आहे. एकटय़ा गणेशलाच साप चावा का घेत आहे. हा विषय आता संशोधनाचा झाला असल्याचे मत कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे.