शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

येथे मिळतो कळणा-कोंड्याच्या भाकरीचा प्रसाद

By विलास.बारी | Updated: August 23, 2017 19:30 IST

कुर्हे पानाचे येथील ८४ सिद्ध चौरंगीनाथ बाबा यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त पोळ्याच्या पाडव्याला यात्रोत्सव

ठळक मुद्देनवसाची पूर्ती करण्यासाठी कळण्याची भाकरी, ठेचा किंवा लाल मिरची व कांदा यांचा असतो प्रसाद. ब्रिटीशांनी सन १८६३ मध्ये मंदिराला दानपत्र व ६ एकर ११ गुंठे जमीन केली बहाल चौरंगीनाथ बाबा यांच्या समाधी मंदिराची विक्रम सवंत ११११ मध्ये बांधकाम

विलास बारी / आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२३ - शेती आणि शेतमजुरी अशी पार्श्वभूमी असलेल्या  कुर्हे पानाचे  (ता. भुसावळ) येथे पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी ८४ सिद्ध चौरंगीनाथ बाबा यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त यात्रेचे आयोजन केले जाते. ९०० वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रोत्सवात कळण्याची भाकरी, ठेचा आणि कांदा याचा प्रसाद म्हणून सेवन करीत नवसपूर्ती केली जाते.भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे हा भाग प्राचीन काळी दंडकारण्य म्हणून परिचित होता. वन आणि वन्यजीवांच्या अधिवासाने समृद्ध असलेल्या या अरण्यामध्ये हर्षोत्तर कालखंडाच्या उत्तरार्धात नवनाथ परंपरेतील ८४ सिद्ध चौरंगीनाथ बाबा यांनी समाधी घेतली होती.९०० वर्षांची परंपराचौरंगीनाथ बाबा यांच्या समाधी मंदिराची विक्रम सवंत ११११ मध्ये बांधकाम करण्यात आले होते. त्यानुसार पोळ्याच्या दिवशी पालखी मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर दुसºया दिवशी समाधी सोहळ्याचा कार्यक्रम होत असतो.  ब्रिटीशांची राजवट असताना सर जॉर्ज रसलक्लार्क यांनी सन १८६३ मध्ये तत्कालिन पुजारी भिकन नाथ यांना दानपत्र व ६ एकर ११ गुंठे जमीन बहाल केली होती.क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जाजिल्हा परिषदेने या मंदिराला सन २००४ मध्ये क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा दिला होता. त्यानुसार या ठिकाणी काही सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्षी भाविकांची दर्शनासाठी व नवसपूर्तीसाठी गर्दी वाढत आहे.

कळण्याची भाकरी, ठेचा व कांद्याचा प्रसादशेतकरी आणि शेतमजुरांची वस्ती असलेल्या कुर्हे पानाचे, गोजोरा व परिसरातील गावातील भाविकांची या मंदिरावर श्रद्धा आहे. या गावातील नागरिकांकडून कुटुंबातील सदस्यांना अपत्यप्राप्ती, कौटुंबिक सुख शांती, शेती, व्यापार व व्यवसायातील यशपूर्ती यासाठी नवस मानले जावू लागले. या नवसाची पूर्ती करण्यासाठी प्रसाद म्हणून कळण्याची (ज्वारी व उडीद मिश्रीत पिठाची भाकरी) भाकरी, ठेचा किंवा लाल मिरची, कांदा घेऊन जात मंदिर परिसरात कुटुंबातील सर्व सदस्य भोजन करीत असतात. वर्षानुवर्षे ही परंपरा कायम आहे.

कुर्हे येथे ८४ सिद्ध चौरंगीनाथ बाबा यांच्या समाधी सोहळ्याला ९०० वर्षांची परंपरा आहे. भाविक नवसपूर्तीसाठी कळण्याची भाकरी आणि ठेचा याचा प्रसाद समाधीस्थळी ठेवून नवसपूर्ती करीत असतात.प्रवीण नाथ, सचिव, चौरंगीनाथ बाबा समाधी मंदिर ट्रस्ट, कुर्हे पानाचे.