आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२९ : रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने सहायक फौजदार रघुनाथ सखाराम कळसकर (वय ५५, रा.भुसावळ) यांना चिरडल्याची घटना बुधवारी रात्री साडे साडे दहा वाजता महामार्गावर अजिंठा चौफुलीवर घडली. हा अपघात इतका भयानक होता की, कळसकर यांच्या डोक्यावरुन ट्रकचे पुढचे टायर गेले तर मागील टायर पोटावरुन गेले. त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रघुनाथ कळसकर हे भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत. मुलगा हेमंत कळसकर एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार्यरत असून जळगावला राहायला आहे. तर मुलगीही जळगावलाच वास्तव्याला आहे. मुलांना भेटण्यासाठी तसेच कार्यालयीन कामासाठी ते बुधवारी जळगावात आले होते. सर्व कामे आटोपून ते दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.झेड १९६१) एमआयडीसीकडूनभुसावळला जात असताना अजिंठा चौफुलीवर रस्ता ओलांडताना इच्छादेवी चौकाकडून आलेल्या ट्रकने (क्र.डब्लु.बी.२३ बी.८९७०) त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्यावरुन ट्रकचे एक टायर गेले तर मागील टायर पोटावरुन गेले.
जळगावात महामार्गावर सहायक फौजदाराला ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:21 IST
रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने सहायक फौजदार रघुनाथ सखाराम कळसकर (वय ५५, रा.भुसावळ) यांना चिरडल्याची घटना बुधवारी रात्री साडे साडे दहा वाजता महामार्गावर अजिंठा चौफुलीवर घडली. हा अपघात इतका भयानक होता की, कळसकर यांच्या डोक्यावरुन ट्रकचे पुढचे टायर गेले तर मागील टायर पोटावरुन गेले. त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले.
जळगावात महामार्गावर सहायक फौजदाराला ट्रकने चिरडले
ठळक मुद्देअजिंठा चौकात रात्री १०.३० वाजता अपघात डोक्यावरुन टायर गेल्याने जागीच मृत्यूभुसावळ तालुका पोलीस स्टेशनला होते कार्यरत