शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

दमदार पावसाने नदी आणि नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:23 IST

समाधान : तोंडापूर प्रकल्पातील जलसाठ्यात भर, वाघुर तसेच बहुळा, वाकी, उतावळीत पाणीच पाणी

जळगाव : जिल्ह्यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभरात काही ठिकाणी झालेल्या पावसाने नदी नाले वाहू लागले आहे. जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे प्रकल्पात या पावसाने चांगल्यापैकी जलसाठा झाला तर पाचोरा तालुक्यातील कुºहाड येथे उतावळी नदीला पूर आला. अनेक ठिकाणी चांगली हजेरी लावली आहे. दरम्यान, काही ठिकाणी अजूनही पावसाची दमदार हजेरी लागली नसल्याने चिंतेचे वातावरण अशा गावांमध्ये आहे.वाकीच्या पुराने पुलावरुन पाणीजामनेर येथेही शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पहूर ता. जामनेर येथे शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान सुमारे १ तास दमदार पाऊस झाला. दुपारी लोंढरी, टाकळी, वाकी, पळासखेडे बुद्रुक परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने वाकी नदीला पूर आला. पहिल्या पुरात झाडे झुडपे पाण्यासोबत वाहुन आल्याने वाकी गावाजवळ पुलाखाली अडकलेल्या झुडपांमुळे पुलावरुन पाणी वाहत होते. यामुळे एसटी बस अडकुन पडली. वाकीचे सरपंच सुधाकर सुरवाडे, दिपक राजपुत, शिवाजी पंचोळे, विलास ढाकरे, अंबादास नरवाडे, विशाल सुरवाडे, लखन लांडगे आदींनी पुलाखालुन घाण काढल्याने पाणी वेगात निघुन गेले व वाहतुक सुरळीत झाली.तोंडापूर प्रकल्पात पाणीतोंडापूर ता.जामनेर येथील सतरा गावांना पाणी पुरवठा करणारे तसेच अजिंठा लेणीसाठी राखीव असलेल्या तोंडापूर मध्यम प्रकल्पात पहिल्याच पावसात पाण्याची वाढ झाली.यावर्षी पाऊस नसल्याने हे धरण पुर्णपणे कोरडे झाले होते. आता गावाच्या पाण्याचाही प्रश्नही मार्गी लागला.शेंदुर्णीत गटारींचे पाणी रस्यावरशेंदुर्णी, ता. जामनेर येथे दुपारी १ तास पावसाने हजेरी लावली. गटारींची स्वच्छता नसल्याने पावसाचे पाणी वाहून न जाता गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आले.वाघुर नदीला पूरगेल्या तीन दिवसांपासून तसेच शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने पहुर ते नेरी या भागातील वाघुर नदीला पूर आला. गेल्या तीन वर्षांपासून या नदीला साधा पुरही नव्हता. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आलेला हा महापुर पाहण्यासाठी नेरी येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यामुळे पहुर, पाळधी, सुनसगांव, देवपिंप्री, नेरी दीगर आणि नेरी बुद्रुक या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.निपाणे येथे प्रथमच दमदारनिपाणे, तालुका एरंडोल येथे गुरुवारी संध्याकाळी व रात्री निपाणे परीसरात प्रथमच पावसाने दमदार जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतकरी वर्ग व मजुर वर्ग काही प्रमाणात सुखावला असून पिक पेरणी करण्यासाठी शेतकरी वर्गात लगबग सुरू झाली. उशीरा का असेना परंतु पावसाने समाधान कारक हजेरी लावली.चाळीसगावी रिमझिमयेथे पावसाने शुक्रवारी सायंकाळी सुमारे अर्धा तास रिमझिम पाऊस झाला. तसेच तालुक्यात काही ठिकाणीही कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली.भडगावात विजांचा कडकडाटभडगाव शहरासह परीसरात दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पावसाची हजेरी झाली. विजेच्या कडकडाटासह २०मिनीटे चालला पाउस. तर तालुक्यातील भातंखडे येथे तब्बल दिडतास पाऊस झाला.धानोऱ्यात जोरदार पाऊसधानोरा, ता.चोपडा परिसरात जोरदार पाऊस पडल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त होते, परंतु गुरुवारी सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. काहींनी मान्सूनपूर्व कापूस पेरणी केलेली होती. या पिकास जीवनदान मिळाले आहे.पाचोºयात चांगली हजेरीयेथे शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस सुरु झाला. नंतर कमी अधिक वेगाने तो रात्रीपर्यंत सुरुच होता. वरखेडीतही चांगली हजेरी लावली. यामुळे बहुळा नदीला पूर आला. तसेच येथील बडोला विद्यालयातील आवारात गुडघाभर पाणी साचले. यामुळे शाळेभोवती तळेच साचले होते.कुºहाडला मुसळधारपाचोरा तालुक्यातील कुºहाड येथे दुपारी पावसाने मुसळधार हजेरी लावली. या पावसामुळे कुºहाडच्या उतावळी नदीला आला पुर आला. हा पूर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी भरपावसात नदीकाठी गर्दी केली होती. पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणुन कुºहाड येथील शाळा सोडून देण्यात आल्या. परंतु दोन्ही कुºहाड खुर्द व बुद्रुक येथील उतावळी नदीला पूर आल्याने नदीवरील पुलाच्या कमी उंचीमुळे पुराचे पाणी पुलावरुन वाहत असल्यामुळे घरी जाणारे विद्यार्थी बराच वेळ अडकलेत.दोन- तीन कि. मी. अंतराच पावसाची ‘कमाल’चाळीसगाव तालुक्यात दोन - तीन कि.मी.अंतरातच पावसाने कमाल केली. कुठे शेतशिवारात पाणीच पाणी आणि नदी,नाल्याला पूर तर कुठे श्रावण महिण्यातील रिमझीम आणि शेतशिवारात कोरडा कोरडा.... असे दृष्य मन्याड परिसरात दिसून आले. मन्याड परीसरातील ब्राम्हणशेवगे,माळशेवगे,हातगांव,अंधारी,पिंप्री या गावांना पावसाने चौकार,सिस्कर लावत धो -धो धुतले तर आडगांव , देवळी,चिंचखेडे,शिरसगांव या गावांना फक्त रिमझीम छिडकावा घातला.