शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाचा पारा 42 अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 13:33 IST

गेल्या आठवडय़ाभरापासुन जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा 42.8 अंशावर पोहचला आहे

 ‘लु’ वा:यांमुळे उष्णतेचा कहर : सात वर्षाचा विक्रम मोडला

जळगाव,दि.29 - गेल्या आठवडय़ाभरापासुन जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा 42.8 अंशावर पोहचला आहे. तापमानाने गेल्या सात वर्षाचा विक्रम मोडला आहे. वाढत्या तापमानामुळे जळगाव शहरात दिवसभर अघोषीत संचारबंदी असल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रात सध्या कोरडय़ा व उष्ण वा:यांचा म्हणजेच ‘लु’ वा:यांचा प्रकोप वाढला असल्याने उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 
जळगाव शहराच्या तापमानाने 42 अंशाचा पारा गाठला आहे. मार्च महिन्यात जळगाव पा:याने 7 वर्षानंतर पहिल्यांदाच 40 अंशाचा पारा ओलांडला आहे. याआधी  2010 मध्ये जळगावचा पारा 41 अंशावर पोहचला होता. त्यानंतर पहिल्यांदाच शहराच्या तापमानाने मार्च महिन्यात 42.8 अंशाचा पारा गाठला आहे. तापमान वाढीमुळे सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणारे जळगाव शहर ‘हॉटसीटी’ म्हणून ओळखले जात आहे. तापमान वाढीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. सकाळी 11 वाजेनंतर शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे उपनगरातील रस्ते देखील ओस पडत आहे. तसेच रात्री उशीरार्पयत उष्णतेचा झळा नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
आठवडाभर राहणार कहर कायम  
उत्तर भारत व राजस्थान कडून येत असलेल्या उष्ण वा:यांमुळे तापमानात वाढ होत असल्याची माहिती पुणे हवामान खात्याने दिली आहे.  ‘लु’ वा:याचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने किमान आठवडाभर तरी जळगावकरांना उकाडय़ापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. यामुळे नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांचे देखील हाल होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडुन भारनियमन सुरु करण्यात आले आहे. यामुळे उकाडय़ापासून त्रस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे. दुपारी 3 तास भारनियमन होत असल्याने जबरदस्त उकाडय़ामुळे घरात राहणे देखील शक्य होत नाही. उन्हाचा प्रकोप वाढल्याने जिल्हा सामान्य  रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आला आहे.