जळगाव : आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ आणि ४५ ते ६० वयोगटातील ज्यांना विविध आजार आहेत. अशांनी को-विन ॲपवर नोंदणी करून लवकरात लवकर कोरोना लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी केले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे को-विन ॲपमध्ये नोंदणी केली आहे. पण त्यांनी लस घेतलेली नाही. आणि ज्यांची नोंदणीच झालेली नाही. अशा आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढील प्रक्रिया करून घ्यावी. तसेच ज्या फ्रंटलाईन वर्कर्सनी ही लस घेतली नाही. तसेच ६० वर्षेपेक्षा जास्त आणि ४५ ते ६० या वयोगटातील ज्यांना इतर आजार आहेत. त्यांनी ही लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.