शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणाच उठली जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 00:30 IST

चार मुलीनंतर झालेल्या मुलाचा अंत : अर्भकाचे डोके गर्भाशयात असलेल्या अवस्थेत पहूर येथील महिला जिल्हा रुग्णालयात

जळगाव :  प्रसूतीदरम्यान अर्भकाचे धड बाहेर आल्यानंतर पूर्ण प्रसूती न होता डोके गर्भाशयातच राहिल्याने तशाच अवस्थेत पहूरच्या महिलेला खाजगी वाहनाने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरअभावी ही वेळ आलेल्या या महिलेला वेळेवर रुग्णवाहिकाही न मिळाल्याने अखेर नवजात अर्भकाचा करुण अंत झाल्याची ह्रदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली. जामनेर तालुक्यातील पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून येथील आरोग्यसेवा ठप्प होऊन उपचारही केले जात नाही. अशातच 8 जानेवारी रोजी मेहराज गफ्फार तडवी (30) या गर्भवती महिलेच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करायचे होते, मात्र  डॉक्टर नसल्याने तिला या रुग्णालयात दाखल करता आले नाही. त्यामुळे तिला पाळधी येथील आरोग्य उपकेंद्रात हलविण्यात आले. तेथे आरोग्यसेविका ज्योती भंगाळे यांनी या महिलेची प्रसूतीची तयारी केली. मात्र प्रसूती दरम्यान अर्भकाचे धड बाहेर तर आले मात्र डोके गर्भाशयातच अडकून राहिले. प्रयत्न करूनही बाळ पूर्ण बाहेर येत नव्हते. त्यामुळे भंगाळे यांनी या महिलेला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. चार मुलीनंतर मुलगाया महिलेला पहिल्या चार मुली आहे. आता मुलाचा गर्भ असताना वेळेवर उपचार न मिळाल्याने या निष्पाप जीवाला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा पुन्हा चव्हाटय़ावरजनतेसाठी विविध शासकीय योजना व आरोग्य विषयक उपाययोजना होत असल्या तरी प्रत्यक्षात आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ आहे, हे पुन्हा या घटनेवरुन सिद्ध झाले आहे. राज्य मार्गावरील व मोठे गाव असलेल्या पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने या महिलेला इतरत्र हलवावे लागले. त्यात वेळेवर एकही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने जन्माला येण्यापूर्वीच अर्भकाला जीव गमवावा लागल्याने आरोग्य यंत्रणाच जीवावर उठल्याचा प्रत्यय या महिलेला आला.  पहूर येथे गेल्या अनेक दिवसापासून वैद्यकीय अधिका:याची नियुक्ती नसल्याने मोठीच अडचण झाली आहे.