शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

प्रेमविवाह करून मंगळवारी परतले अन्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:13 IST

(सेंट्रल डेस्कसाठी) फोटो आहे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पाळधी येथील एका तरुणीने गावातीलच तरुणासोबत प्रेमविवाह केल्यानंतर दोन दिवसातच ...

(सेंट्रल डेस्कसाठी)

फोटो आहे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पाळधी येथील एका तरुणीने गावातीलच तरुणासोबत प्रेमविवाह केल्यानंतर दोन दिवसातच अर्थात शुक्रवारी सकाळी तिचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरती विजय भोसले (२०) असे या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, सासरच्या मंडळीने तिचा घातपात केला असल्याचा आरोप करीत त्यांना अटक होत नाही तोवर मृतदेह न स्वीकारण्याचा पवित्रा माहेरच्यांनी घेतल्याने शुक्रवारी (दि.१) दुपारी जिल्हा रुग्णालयात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आरती भोसले ही तरुणी ६ डिसेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता झाली होती. मुलगी परतली नाही त्यामुळे कुटुंबीयांनी पाळधी पोलिसांत बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. दरम्यान, मंगळवारी (दि. २९) दत्तजयंतीच्या दिवशी ती पाळधी गावातीलच प्रशांत विजयसिंग पाटील या तरुणासोबत विवाह करून परतली. तिचे प्रशांतवर प्रेम होते.

वडिलांना बोलाविले पोलीस ठाण्यात

प्रेमविवाह केल्यानंतर मंगळवारी आरती व प्रशांत पाळधी पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांना प्रेमविवाह केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. दोन्ही कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर आरती त्याच दिवशी पती प्रशांतसोबत सासरी गेली.

‘प्रशांत’चा मित्र आला धावत...

आरती हिला सासरी दोन दिवस होत नाही तोवर शुक्रवारी सकाळी तिच्या पतीचा मित्र हा आरतीच्या माहेरी धावत गेला आणि आरतीच्या आईला त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. हे ऐकताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरतीच्या काकूलाही घटना कळताच, त्यांनीसुद्धा धाव घेतली. आरतीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला.

सासरचे व मित्रांनी घातपात केल्याचा आरोप

सकाळी जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर मुलीचा पती, त्याचे वडील व मित्रांनी घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला. तिच्यावर अत्याचार केल्याचाही खळबळजनक आरोप आरतीच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, जेव्हा आरती हिचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते, त्यामुळे हा घातपात आहे, त्यामुळे संबंधिताना अटक करण्यात यावी, अशी मागणी भोसले कुटुंबीयांनी केली.