शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

भादलीसारखे हत्याकांड घडविण्याची धमकी देत पत्नीला पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : न्यायालयात पती-पत्नीचे घटस्फोटाचे प्रकरण सुरु असतानाच जावयाने सासऱ्याला चावा घेऊन मेडिकलवर बसलेल्या पत्नीला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : न्यायालयात पती-पत्नीचे घटस्फोटाचे प्रकरण सुरु असतानाच जावयाने सासऱ्याला चावा घेऊन मेडिकलवर बसलेल्या पत्नीला रिक्षातून जबरदस्तीने पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ११ वाजता दूध फेडरेशनजवळ घडला. दरम्यान, भादलीसारखे हत्याकांड घडविण्याचीही धमकी जावयाने दिली आहे. याप्रकरणी सासरे शिवाजी जयराम पाटील (रा.वडनगरी, ता.जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन जावई प्रशांत दत्तू पाटील (रा.गौरीशंकर अपार्टमेंट, धांडेनगर) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वडनगरी येथे शिवाजी पाटील हे पत्नी आशाबाई मुलगी अश्‍विनी, मुलगा गणेश यांच्यासह वास्तव्यास आहेत. शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह भागतो. मुलगी अश्‍विनी हिचा १ डिसेंबर २०१६ रोजी धांडेनगर येथील प्रशांत दत्तू पाटील याच्याशी विवाह झाला. दोघांना एक मुलगी आहे. लग्नानंतर काही दिवसात पती प्रशांत हा त्रास देत असल्याने अश्‍विनी, तिची मुलगी माही हे तीन वर्षापासून माहेरी वडनगरी येथे राहत आहेत. अश्‍विनीचे मेडीकलचे लायसन्स असल्याने वडिलांनी तिला दूध फेडरेशन परिसरत मेडीकल सुरु करुन दिले. अश्‍विनी व तिचा भाऊ गणेश हे दोघे मेडीकल सांभाळतात.

पत्नीला जबरदस्तीने रिक्षात बसविले

सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिवाजी पाटील हे मुलीच्या मेडीकलवर गेले. याठिकाणी मुलगी अश्‍विनीसोबत जावई प्रशांत पाटील बसलेला होता. सासऱ्यांनी जावई प्रशांत याला न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण सुरु असताना तू इथं का आला, असे म्हटले असता प्रशांत याने शिवाजी पाटील यांना शिवीगाळ केली. तसेच तुला व तुझ्या संपूर्ण परिवाराला जिवंत ठेवणार नाही, भादलीला ज्याप्रमाणे घटना घडली आहे, तशी अवस्था तुमची करुन टाकीन अशी धमकी देत मारहाण करायला सुरुवात केली, त्यानंतर डाव्या हाताच्या बोटाला चावा घेवून दुखापत केली, यानंतर प्रशांत हा पत्नीला रिक्षात (क्र.एम.एच.१९ -८४४१) बसवून जबरदस्तीने घेवून गेला. यावेळी मेडीकलमध्ये असलेल्या पंकज बाळू सोनवणे, चंद्रकिरण लोटू पाटील यांनी शिवाजी पाटील यांना सोबत घेत पोलीस ठाणे गाठले. शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरुन प्रशांत दत्तू पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रवींद्र पाटील हे करीत आहेत.

--