शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

पैशासाठी त्याने जन्मदात्यांच्याच पोटात घातल्या लाथा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पैसे व शेत जमिनीसाठी जन्मदात्या आई-वडिलांच्या पोटात लाथा व कानाखाली आवाज काढून मुलानेच त्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पैसे व शेत जमिनीसाठी जन्मदात्या आई-वडिलांच्या पोटात लाथा व कानाखाली आवाज काढून मुलानेच त्यांना घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे आई, वडिलांना मारहाण करणारा हा मुलगा जळगाव पोलीस दलात कार्यरत आहे. हे वृद्ध दाम्पत्य आज एका वृद्धाश्रमात अश्रू ढाळत आहेत.

लोकमत प्रतिनिधीने मंगळवारी वृद्धाश्रमात जाऊन या वृद्ध दाम्पत्याची भेट घेतली. त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. ७३ वर्षीय पांडुरंग व ६८ वर्षीय सुमन (नाव बदलली आहेत.) १६ एप्रिल रोजी वृद्धाश्रमात दाखल झाले. पांडुरंग हे नागपूर पोलीस दलात नोकरीला होते. मुलगा संदीप हा देखील नागपूर पोलीस दलात नोकरीला होता. सेवानिवृत्तीनंतर ते काही दिवस नागपुरातच राहिले, नंतर मुलाच्या आग्रहाखातर तेथील नऊ खोल्यांचे घर विक्री करून जळगावात आले. मुलानेही आपली जळगावात बदली करा नाही तर राजीनामा देतो असा दम भरला.‌ वडिलांनी पोलीस दलातील ओळखीचा वापर करून मुलालाही जळगावात आणले.

नागपुरातले घर २७ लाखात विक्री केल्यानंतर जळगावात जागा घेऊन २२ लाखाचे घर बांधले. घर बांधल्यानंतर उरलेले साडे चार लाख रुपये मिळावे म्हणून संदीप याने वडिलांशी वाद घातला. तेथूनच वादाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

१२ एप्रिलचा प्रसंग सांगताना ते ढसाढसा रडले

१२ एप्रिल रोजी कपड्यांवरून पती-पत्नीत वाद झाला. त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला असता संदीप याने पोटात जोरात लाथ मारली, त्यानंतर कानाखाली वाजवली. याच्याही पुढे जावून कॅन्सरची शस्त्रक्रिया झालेल्या आईला मारहाण करून खाटेसह बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, हा प्रसंग सांगत असताना वृद्ध दाम्पत्य ढसाढसा रडू लागले. १२ तारीख डोळ्यासमोर आली की कसंतरी होतंय, असा मुलगा डोळ्यासमोरही नको अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. याआधी ६ नोव्हेंबर २०२० व १ फेब्रुवारी २०२१ रोजी अशीच मारहाण केली होती, असे पांडुरंग यांनी सांगितले.

पेन्शनचे तीन लाख रुपये नेले

पेन्शन व फंडाचे जमविले तीन लाख रुपये मुलगा संदीप याने धाकात घेऊन नेले. या आधी पत्नीच्या नावावर असलेली दोन एकर शेत जमीन जबरदस्तीने सह्या घेऊन स्वतःच्या नावावर करून घेतली घरातले काही दागिनेही आज सापडत नाही.

शिक्षिका मुलीची एस.पींकडे तक्रार

पांडुरंग यांची मुलगी औरंगाबाद येथे आहे. आई-वडिलांना असलेला त्रासाबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रत्यक्ष फोनवर बोलून घटनाक्रम सांगितला. पोलीस अधीक्षकांनी आई-वडिलांना न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा असल्याचे या शिक्षिकेने ''लोकमत''ला सांगितले.

कोट...

मुलासाठी आम्ही काय केले आहे, हे आम्हालाच माहित. मात्र ऐन वृद्धापकाळात मुलाकडून असा छळ होईल हे स्वप्नातही बघितले नव्हते. या मुलाचे आम्हाला आता तोंडही बघायचे नाही. वृद्धाश्रमात येऊन तो आम्हाला मारहाण करू शकतो.

- पोलीस अमलदार मुलाचे वडील