शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

विष घेऊन तो गावात चालतच आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:28 IST

जळगाव : तालुक्यातील भोलाणे येथे गोकुळ सुकदेव सपकाळे (वय २२) या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

जळगाव : तालुक्यातील भोलाणे येथे गोकुळ सुकदेव सपकाळे (वय २२) या तरुणाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गोकुळ याने बुधवारी दुपारी शेतात काम करीत असताना विष घेतले व तसाच तो गावात आला. चुलत भावाला हा प्रकार समजल्यानंतर त्याला तातडीने जळगावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी पहाटे दोन वाजता त्याची मृत्यूशी झुंज संपली. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अजून तरी समोर आलेले नाही.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ सुकदेव सपकाळे हा आई वडिलांसह भोलाणे गावात वास्तव्याला होता. भोलाणे शिवारात त्याचे शेत असून शेती व मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा. बुधवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास शेतात काम करत असतांना शेतासाठी लागणारे विषारी औषध गोकुळ सपकाळेने प्राशन केले. विषारी औषध घेतल्यानंतर तसाच तो गावात आला. चुलतभाऊ जगदीश सपकाळे याला त्याने आपण विषारी औषध घेतल्याचे सांगितले. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गोकुळ याच्या पश्चात आई सुलाबाई, वडील सुकदेव सपकाळे, तुकाराम आणि मदन हे दोन मोठे भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. दोन्ही मोठे भाऊ विवाहित असून कुटुंबासह ठाणे येथे राहतात. गोकुळ हा अविवाहित होता.