जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरूवारी तीन जणांना सर्पदंशाने दाखल करण्यात आले आहे. त्यातील सुभाषवाडी ता. जळगाव येथील सुभाष श्रावण राठोड (वय २२) याला शेतात काम करत असतांना साप हाताच्या बोटाला साप चावला. त्यानंतर त्याने तो साप घेऊनच रुग्णालयात पोहचला. हा साप बिनविषारी होता. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तिघांना विषबाधा
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरूवारी तीन जणांना विषबाधेमुळे दाखल करण्यात आले होते. त्यात शहरातील जमुना नगर येथील रहिवासी तरुणाने विष प्राशन केले. त्याला नातेवाईकांनी दुचाकीवरुन थेट रुग्णालयात आणले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यासोबतच एका भडगाव येथून तर १८ वर्षीय तरुणाला फत्तेपूर ता. जामनेर येथून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.