शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याहून गाडीभरुन कागदपत्र आणले न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST

फोटो क्र.५ जळगाव : बीएचआरचा संस्थापक प्रमोद रायसोनीसह १४ संचालकांविरुध्द पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील एक गाडीभरुन कागदपत्रे बुधवारी जळगाव ...

फोटो क्र.५

जळगाव : बीएचआरचा संस्थापक प्रमोद रायसोनीसह १४ संचालकांविरुध्द पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील एक गाडीभरुन कागदपत्रे बुधवारी जळगाव न्यायालयात आणण्यात आले. पोलिसांचे एक पथक सकाळीच न्यायालयात आले. ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याच्या प्रकरणात राज्यात ८१ पोलीस ठाण्यात संचालक मंडळाविरुध्द गुन्हा दाखल असून त्यातील २६ गुन्हे पुणे शहर व जिल्ह्यात दाखल आहेत. या गुन्ह्यांचे कामकाज जळगाव न्यायालयात चालविले जात आहे. त्यामुळे एकेका गुन्ह्यातील कागदपत्रे जळगाव न्यायालयात आणायला सुरुवात झाली आहे. आता नव्याने पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवरसह १० जणांना आरोपी करण्यात आले आहे.

प्रमोद रायसोनीसह संचालक मंडळावर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे, जेजुरी, निगडी, हडपसर, सांगवी, शिक्रापुर, सिंहगड (२ गुन्हे), डेक्कन, को‌थरुड, पिंपरी, चिंचवड, विश्रनाथवाडी, भोसरी, वारजे मालवडी, खडकी, भारती विद्यापीठ, मार्केट यार्ड, आळंदी,मंचर, बारामती शहर, इंदापूर, भिगवान, नारायणगाव, खेड आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बुधवारी एक पथक सकाळीच न्यायालयात दाखल झाले. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांच्याशी या पथकाने बराचवेळ चर्चा केली. सायंकाळपर्यंत पथक न्यायालयात थांबूनच होते.

वाणी, पगारिया यांचे कामकाज लांबले

नव्याने डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रकाश वाणी व अनिल पगारिया यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुणे विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. वाणी यांना तात्पुरता जामीन मंजूर केला होता. त्याच्यासह पगारिया याच्याही अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी कामकाज होणार होते, मात्र ते आता लांबणीवर पडले. दरम्यान, अटकेतील विवेक ठाकरे, सुजीत वाणी, कमलाकर कोळी यांनीही जामीनासाठी अर्ज केला आहे, त्यावर २१ डिसेंबर रोजी तर पगारिया याच्या जामीन अर्जावर ०५ जानेवारी रोजी कामकाज होणार आहे.