पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादीक व नाजीम दोघंही शाहू नगरातील इंद्रनगरात शेजारी रहायला आहेत. सादीक हा नाजीम याच्या पत्नीकडे बघत असल्याने १६ मार्च रोजी दुपारी साडे चार वाजता त्याने सादीकला तू माझ्या पत्नीकडे का बघतोस असा जाब विचारला. त्यावर त्याचा राग आल्याने सादीक याने लोखंडी रॉड आणून नाजीमच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. त्यानंतरही उजव्या डोळ्यावर, हाताच्या उजव्या दंडावर, कमरेवर व नाकावर मारहाण केली. यावेळी त्याचे नातेवाईक कल्लू याकूब शेख व शाहीद याकूब शेख यांनीही मारहाण केल्याचे नाजीम याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नाजीम याला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार झाल्यानंतर गुरुवारी त्याच्या जबाबावरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पत्नीकडे का बघतोस म्हटले अन् डोक्यात रॉड टाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:15 IST