भुसावळ : शहरातील मुख्य वर्दळीच्या जवाहर डेअरी ते डिस्को टॉवर भागात लोटगाडीचालकांसह अन्य व्यावसायिकांमुळे रहदारीसह व्यापा:यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याने पालिकेने हॉकर्स झोनची अंमलबजावणी करण्याचे सूतोवाच केले होत़े त्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवल्यानंतर त्यात आलेल्या त्रुटी दूर न केल्याने अंमलबजावणी रखडली आह़े तत्कालीन मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या कार्यकाळात हा प्रस्ताव पडून राहिल्याने अंमलबजावणी रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली़ हॉकर्स झोनची अंमलबजावणी झाली असती तर वर्दळीच्या भागात होणारी वाहतूक कोंडी टळून पालिकेच्या उत्पन्नातदेखील मोठी वाढ झाली असती़ हॉकर्स झोनची घोषणा शहरातील आठवडे बाजार परिसरात मोठय़ा प्रमाणात व्यावसायिक रस्त्यावरच लोटगाडय़ा लावतात़ यातून व्यापारी व लोटगाडीचालकांमध्ये होत असलेल्या संघर्षानंतर माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पुढाकार घेत हॉकर्स झोन बनवणार असल्याची घोषणा केली होती़ त्याअंतर्गत मुंबईच्या एक्ससीसी कंपनीला त्याचा आराखडा करण्याचा ठेका देण्यात आला़ संबंधित एजन्सीने सव्रेक्षण पूर्ण करून पालिकेला त्याबाबत अहवाल सादर केल्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला़ स्वाक्षरीअभावी प्रस्ताव रखडला हॉकर्स झोनला शासनाने परवानगी दिली असली तरी किरकोळ त्रुटींमुळे तो प्रस्ताव पुन्हा पालिकेत आला. मात्र तत्कालीन मुख्याधिकारी भारत राठोड यांनी स्वाक्षरी न केल्याने प्रस्तावाचा पाठपुरावा रखडला, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली़ अतिक्रमणाची डोकेदुखी आठवडे बाजारात किमान 200 हून अधिक विविध व्यवसाय करणारे लोटगाडीचालक रस्त्यावरच लोटगाडय़ा लावतात़ परिणामी या भागातून दुचाकीवर तर सोडा, पायी चालणेदेखील कठीण होत़े आठवडे बाजारात मुख्य वर्दळीच्या ठिकाणी व्यापा:यांच्या दुकानाबाहेरच लोटगाडय़ा लागत असल्याने त्याचा ग्राहकीवर परिणाम होत आह़े दुकानाबाहेर लागलेल्या लोटगाडय़ांमुळे ग्राहक एकतर खरेदीसाठी येत नाही वा दुस:या दुकानाकडे वळतो, असे व्यापारिवर्गाचे म्हणणे आहे. तर गेल्या 30 वर्षापासून हातगाडीचालक व्यवसाय करतात़ दिवसभराच्या कमाईतून त्यांचा रहाटगाडा चालतो़
हॉकर्स झोनची अंमलबजावणी रखडली
By admin | Updated: December 22, 2015 00:32 IST