शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

हतनूर धरणावर पोहोचले देशभरातील पक्षीनिरीक्षक; रशिया, चीनमधील पक्षांची झाली नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:39 IST

‘महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र

ठळक मुद्देचातक संस्थेतर्फे आयोजन वन कर्मचा-यांना पक्षीनिरीक्षनाचे प्रशिक्षण

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 1 -  जळगाव जिल्हा वन विभाग, सामाजिक वनीकरण जळगाव व चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या संयुक्तविद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवशीय स्थलांतरीत पक्षीनिरीक्षण शिबिराचा समारोप झाला. ‘महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र’ (आय.बी.ए.) या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त हतनूर धरण व परिसरात जलाशयाच्या दलदलीमुळे हिवाळ्याच्या दिवसांत पक्षांसाठी विपुल प्रमाणात अन्न उपलब्ध असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे हिवाळ्यात युरोप, सैबेरिया, रशिया, मंगोलिया, चीन, उत्तर भारत या भागातून स्थलांतर करुन येणा:या पक्षांची संख्या दिसून येत आहे. यावर्षी देशभरातून पक्षीअभ्यासकांनी पक्षीनिरीक्षणासाठी येथे हजेरी लावली. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खासदार रक्षा खडसे, भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारे, आयुध निर्माणी वरणगावचे महाप्रबंधक एस. चटर्जी, सामाजिक वनीकरण जळगावचे उपसंचालक सुरेंद्र वढई, महाराष्ट्र राज्य अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक (कॅम्पा) एस. एच. पाटील,  प्रा. डॉ. सुनील नेवे, अटल प्रतिष्ठान भुसावळचे नगरसेवक नेमाडे  आदी उपस्थित होते.यावर्षी प्रथमच चातक निसर्ग संवर्धन संस्थेने हतनूर धरण परिसरातील मेहूण या ठिकाणी तीन दिवशीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात दिल्ली, बंगलोर, मुंबई, चेन्नई, पुणे, गुजरात, नागपूर इत्यादी ठिकाणांहून संपूर्ण भारतातील 25 पक्षीअभ्यासक तसेच पक्षीप्रेमींनी हतनूर धरण परिसर व नदीपात्रात बोटीमध्ये भ्रमंती करुन दुर्बीण व कॅमेरासारख्या विविध उपकरणांच्या साहाय्याने पक्षांचा अभ्यास केला.                                 35 वन अधिकारी आणि  वनकर्मचारी असे एकूण 60 शिबिरार्थी होते, त्यात वन कर्मचा-यांना पक्षीनिरीक्षनाचे प्रशिक्षणही देण्यात आले.                        हतनूर धरण परिसरात पक्षीअभ्यासकांना पक्षी वैविध्याची माहिती चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी दिली. यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, लालसरी, थापाटय़ा, शेंडी बदक, नदीसुराय, छोटा शराटी, कृष्ण थिरथिरा, घोंगी, खंड्या, चातक व काही आंतरराष्ट्रीय स्तरावर धोकाग्रस्त जाहीर झालेल्या दुर्मिळ प्रजातीही या ठिकाणी आढळून आल्या. त्यांच्या संवर्धनासाठीच या जलाशयाला महत्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे.चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, उपाध्यक्ष शिवाजी जवरे, सचिव उदय चौधरी, लक्ष्मीकांत नेवे, मनोज बडगुजर आदी सदस्य पक्षीप्रेमी व पक्षीअभ्यासक कार्यक्रमास उपस्थित होते.