जळगाव - लग्नापूर्वीचा पगार व दुचाकी घेण्यासाठी माहेरून पैसे आणावे यासाठी विवाहितेचा मानसिक शारीरिक छळ केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमखेडी शिवारातील रहिवासी वैष्णवी यांचे २०१८ मध्ये भडगाव येथील भुषण पाटील यांच्याशी विवाह झाला. मात्र, लग्नाच्या काही महिन्यानंतर सासरच्यांनी माहेरून लग्नापूर्वीचा पगार आणावा तसेच ब्रेसलेट व दुचाकी घेण्यासाठी माहेरून पैसे आणावे, म्हणून विवाहितेचा छळ केला. तसेच पतीकडून मारहाण होवू लागली. अखेर वैष्णवी यांनी माहेर गाठले. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती भूषण पाटील, जेठ विशाल पाटील, जेठाणी विजया पाटील, सासरे गोरखनाथ पाटील, सासू अरूणा पाटील, जेठाचे सासरे भगवान देवरे यांच्याविरूध्द काही दिवसांपूर्वी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.