शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

तीन मजली इमारतीवर पडणार हातोडा

By admin | Updated: October 2, 2015 00:55 IST

जळगाव : शिरसोली रस्त्यालगतच्या सव्र्हे नं.413 मधील तीन मजली इमारतीवर मनपाचा हातोडा पडणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.

जळगाव : मनपा हद्दीतून जाणा:या जळगाव-शिरसोली- पाचोरा राज्य मार्गापासून ठरवून दिलेले अंतर तसेच त्या शेजारी 12 मीटर सेवा रस्ता व त्यापासून 3-4 मीटरचे सेटबॅक (अंतर) सोडूनच बांधकाम करणे आवश्यक असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनपाला दिला आहे. त्यामुळे या रस्त्यालगतच्या सव्र्हे नं.413 मधील तीन मजली इमारतीवर मनपाचा हातोडा पडणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली. त्यादृष्टीने या रस्त्यालगत आणखी किती अशाप्रकारची बांधकामे आहेत? याचे सव्रेक्षण सध्या नगररचना विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.

जळगाव शहर मनपा हद्दीतून जाणा:या जळगाव-शिरसोली- पाचोरा या राज्य मार्गालगत मौजे मेहरूण स.नं.413, प्लॉट नं.161 वरील बांधकामाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून गाजत आहे. या मूळ शेतजमीनीचे तत्कालीन सहायक संचालक, नगररचना यांच्या 26 मार्च 1973 च्या पत्रान्वये रेखांकन नकाशे मंजूर करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांनी 23 ऑगस्ट 1973 मध्ये अभिन्यासातील भूखंडांना मंजुरी दिली आहे.

स.नं.413 मधील श्री डेव्हलपर्स यांच्या मालकीच्या जागेवर मनपाने 26 जुलै 2012 रोजी 1 एफएसआयच्या अनुषंगाने बांधकाम परवानगी दिलेली होती. ही परवानगी देताना मनपाने सार्वजनिक बांधकाम विभागाचा इमारत रेषा (बिल्डींग लाईन) /नियंत्रण रेषा याबाबतचा अभिप्राय घेतला नव्हता. तसेच या अनुषंगाने शासन निर्णय 9 मार्च 2001 नुसार नियमांचे पालन केलेले नव्हते. श्री डेव्हलपर्स यांनी या जागेवरील दोन मजले बांधकामासाठी सुधारित बांधकाम परवानगी मनपाकडे 11 नोव्हेंबर 2014 रोजी दाखल केल्यानंतर मनपाने त्यांना 16 जानेवारी 2015 च्या पत्रान्वये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम रेषेचेच्या अनुषंगाने ना-हरकत प्रमाणपत्र सादर करण्याबाबत कळविले होते.

पालकमंत्र्यांकडील बैठकीनंतर गती

पालकमंत्र्यांकडे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर या विषयाला पुन्हा गती मिळाली.

मनपा आयुक्तांनी 4 सप्टेंबर 2015 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्र पाठवून राज्य मार्ग लक्षात घेऊन किती अंतरावर बांधकाम/नियंत्रण रेषा असणे आवश्यक आहे? अशी विचारणा केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने मनपाला 15 सप्टेंबर 2015 च्या पत्रान्वये उत्तर दिले आहे. त्यानुसार बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार मनपाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ना-हरकत देण्याचा विषय येत नाही. मात्र तरीही शासन निर्णयानुसार रस्त्याच्या हद्दी शेजारून 12 मीटर सेवा रस्ता, तसेच 3 ते 6 मीटर सेट बॅक एवढय़ा अंतरावर बांधकाम रेषा असावी, असे स्पष्ट केले आहे.

कारवाई अटळ

बांधकाम विभागाच्या या पत्रानंतर नगररचना विभागाने एकाच बांधकामावर कारवाई न करता या रस्त्यावरील अन्य अशाप्रकारच्या बांधकामांचा सव्र्हे सुरू केला आहे. त्यावर एकत्रितपणे कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे स.नं.413 वरील तीन मजली इमारतीवरही मनपा हातोडा पडणार असल्याची चर्चा आहे.

राज्य मार्गाची स्थिती

जळगाव-वावडदे- नांद्रा रस्ता रस्ते विकास योजना 1961-1981 नुसार प्रमुख जिल्हा मार्ग क्र.22 असा होता. हा रस्ता रस्ते विकास योजना 1981-2001 नुसार जळगाव-पाचोरा- वाडी- सातगाव- बनोटी- भराळी मार्ग राज्य मार्ग क्र.184 असा झाला. त्यानंतर रस्ते विकास योजना 2001-2021 नुसार चोपडा, खेडी, भोकर, आमोदा, कानळदा, जळगाव, पाचोरा, वाडी, सातगाव, बनोटी, भराळी मार्ग, राज्यमार्ग क्र.40 असा झाला आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.6 पासून सुरू होत असून तेथून जुनी नपाच्या हद्दीर्पयतचा म्हणजे स.नं.416 र्पयतचा 1 किमी रस्ता पूर्वीच मनपाकडे हस्तांतरित झाला असून उर्वरित 2 किमी रस्ता मनपाच्या वाढीव हद्दीत आणखी 2 किमी रस्ता हस्तांतरित झाला आहे.

 

न्यायालयात दाद मागणार

सार्वजनिक बांधकाम विभागाने अहवाल देताना 2004च्या शासन निर्णयाचा विचार केलेला नाही. 1972 मध्ये ले-आऊटला मंजुरी मिळाली. त्यानंतर मनपाने बांधकाम परवानगी दिली. मात्र आता कुणाच्यातरी दबावाखाली हा निर्णय घेतला जात आहे. मात्र इमारत नियमानुसार बांधलेली आहे. तिला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही. त्यात नागरिक रहायला आले आहेत. बँकांनी कागदपत्र तपासूनच कर्ज दिले आहे. तसेच याबाबत आम्हाला नोटीस मिळालेली नाही. नोटीस मिळाल्यास न्यायालयात दाद मागू. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. दबावतंत्राचा भाग म्हणून हा प्रकार सुरू आहे. मात्र हा नियम एकटय़ाला लागू होऊ शकत नाही. तो लागू करावयाचा झाला तर इच्छादेवी चौकापासून श्रीकृष्ण लॉन्सर्पयतही लागू करावा लागेल. हा नियमच चुकीचा आहे. न्यायालयात तो टिकणार नाही.

-श्रीकांत खटोड, संचालक, श्री डेव्हलपर्स